शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे पिकांना जीवदान

By admin | Updated: September 8, 2014 00:37 IST

अचानक नदारद झालेल्या पावसामुळे यंदाही पिकं धोक्यात आली होती. सध्याच्या स्थितीत पिकांना पाणी मिळाल्यास पिकं करपण्यास सुरूवात होणार अशी स्थिती दिसून येत होती.

गोंदिया : अचानक नदारद झालेल्या पावसामुळे यंदाही पिकं धोक्यात आली होती. सध्याच्या स्थितीत पिकांना पाणी मिळाल्यास पिकं करपण्यास सुरूवात होणार अशी स्थिती दिसून येत होती. त्यामुळे हातची पिके यंदाही गमवावी लागणार या चिंतेत शेतकरी होता. मात्र मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्यात परतून आलेल्या या पावसाने पिकांना जीवदान मिळाले. येथे सांगायचे झाल्यास मागील वर्षीची अतिवृष्टी व रबी हंगामातील गारपीट शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी पुरी आहे. मात्र जिल्ह्यातला शेतकरी जन्माला आल्यापासून या परिस्थितींचा सामना करीत मातीतून सोनं काढत असल्याने त्याला निसर्गाच्या या खेळाची सवय जडली आहे. त्यामुळेच प्रत्येक परिस्थितीशी निपटून घेत येथील शेतकरी धानाचं वाटं कधीच रित होऊ देत नाही. यंदा खरीपाच्या हंगामातही पावसाने सुरूवातीपासूनच खेळी केली. उशीरा आलेल्या पावसाने शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढविले. मात्र शेतकऱ्या आहे त्या परिस्थितीचा सामना करीत शेती केलीच. येथील कृषी विभागाने २८ आॅगस्ट पर्यंतची दिलेली रोवणीची आकडेवारी बघता जिल्ह्यात १०१ टक्के रोवणी झाली होती. तालुकानिहाय बघितल्यास गोंदिया तालुक्यात ३८ हजार १२५ हेक्टर, तिरोडा ३० हजार ५५ हे., आमगाव २० हजार २३० हे., सालेकसा १६ हजार १०४ हे., देवरी २१ हजार ०१९ हे., अर्जुनी मोरगाव २२ हजार ६६५ हे. तर सडक अर्जुनी तालुक्यात १८ हजार ३९१ हेक्टर क्षेत्रात भातपिकाची रोवणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात एक लाख ८४ हजार ९०० हेक्टर सर्व साधारण क्षेत्र आहे. मात्र यंदा एक लाख ८७ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रात रोवणी झाली आहे. आजपर्यंत त्यात अधिक भर झाली असावी. मात्र पिकं आता पाचरे फुटण्याच्या स्थितीत आले असून त्यांना पाण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. मात्र वेळीच पावसाने दडी मारल्याने हाती आलेली पिकं गमावण्याची भिती शेतकऱ्यांना जाणवत होती व त्यामुळेच शेतकरी चिंताग्रस्त होता. अशात ऐनवेळी निसर्गाने साथ दिली व मागील चार-पाच दिवसांपासून पावसाने पुन्हा जिल्ह्यात हजेरी लावली. परतून आलेल्या या पावसाने पिकांची तहान भागविली असून त्यांना जीवदान दिले आहे. यामुळे शेतकरीही सुखावला असल्याचे बघावयास मिळत आहे. (शहर प्रतिनिधी)