शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

‘त्या’ मुलाच्या प्रकृतीत थोडी सुधारणा

By admin | Updated: May 25, 2015 01:11 IST

प्रशिक्षणादरम्यान स्विमींग पूलमध्ये बुडालेल्या त्या मुलावर नागपूरच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा असल्याचे कुटुंबीयांकडून कळले.

उपचार सुरू : डॉक्टरांनी दिली ७२ तासांची वेळ गोंदिया : प्रशिक्षणादरम्यान स्विमींग पूलमध्ये बुडालेल्या त्या मुलावर नागपूरच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा असल्याचे कुटुंबीयांकडून कळले. डॉक्टरांनी ७२ तासांची वेळ दिली असून त्यानंतरच प्रकृतीबद्दल स्पष्ट होणार आहे. येथील साकेत पब्लिक स्कूलमध्ये सुरू असलेल्या स्विमींगच्या प्रशिक्षणादरम्यान छगन मंगलप्रसाद मेश्राम (१७) हा शनिवारी सकाळी ७.३० वाजता दरम्यान स्विमींग पूलमध्ये बुडाला होता. यात त्याची प्रकृती गंभीर असल्याने लगेच त्याला गोंदिया हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले होते. मात्र तेथे त्याच्या प्रकृतीत काहीच सुधारणा दिसून येत नसल्याने सायंकाळी ७ वाजता दरम्यान कुटुंबीयांनी त्याला नागपूरला हलविले. तर रात्री १०.३० वाजता दरम्यान नागपूरच्या वर्धा रोड स्थित श्रीकृष्ण हॉस्पीटलमध्ये त्याला उपचारार्थ भरती करण्यात आले. छगनच्या प्रकृतीबाबत त्याच्या कुटुंबीयांकडे विचारणा केली असता त्यांनी थोडीफार सुधारणा दिसून येत असल्याचे सांगितले. मात्र डॉक्टरांनी ७२ तासांची वेळ दिली असून त्यानंतर काय ते स्पष्ट होणार असल्याचेही सांगितले. त्यामुळे अद्याप तरी छगनच्या प्रकृतीबद्दल काहीच स्पष्ट झाले नसून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (शहर प्रतिनिधी)