शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांचा आहार निकृष्ट

By admin | Updated: September 14, 2015 01:38 IST

बोळदे-कवठा येथील अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचे आहार दिले जात आहे. त्यामुळे बालकांचे पोषण होईल की त्यांची वाटचाल कुपोषणाच्या दिशेने होईल, अशी समस्या पुढे आहे.

पालकांमध्ये रोष : अनियंत्रित कारभारामुळे अंगणवाडीत कर्मचाऱ्यांची मनमर्जीबाराभाटी : बोळदे-कवठा येथील अंगणवाडीत बालकांना निकृष्ट दर्जाचे आहार दिले जात आहे. त्यामुळे बालकांचे पोषण होईल की त्यांची वाटचाल कुपोषणाच्या दिशेने होईल, अशी समस्या पुढे आहे. या प्रकारामुळे गावकरी चिंतीत असून त्यांच्यामध्ये रोष पसरला आहे.४ सप्टेंबर रोजी बालकांना अंड्यांचा आहार देण्यात आला. ते अत्यंत निकृष्ट होते. ते काही बालकांनी खाण्याचा प्रयत्नही केला. ही बाब पालकांना कळताच त्यांची याची तक्रार वरिष्ठांकडे केली. मात्र कारवाई थंडबस्त्यात आहे. साधी चौकशीसुद्धा अद्याप करण्यात आली नाही. अशा आहारामुळे बालकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहू शकतो. सदर अंगणवाडी केंद्राचे परिसर अस्वच्छ आहे. त्या ठिकाणी सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका नेहमीच संभवतो. अंड्यांचे वरील सोल, केरकचरा व गढूळ पाणी परिसरात पसरले असते. असा प्रकार अंगणवाडी सेविका व कर्मचारी करीत आहेत. याकडे कोणताही अधिकारी किंवा सुपरवायझरचे लक्ष नाही. सुपरवायझरसुद्धा कधीही या अंगणवाडीला भेटी देत नाही. त्यामुळे स्वत:च्या मनमर्जीने अंगणवाडी सेविका बोळदे-कवठा येथील अंगणवाडी चालविते व अरेरावीपणा करते, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. येथे बालकांच्या खिचडीमध्ये दाळ वापरली जात नाही. ती खिचडी न दिसता पाणीच दिसते. सेविका ही नियमित येत नसून सभेचा बहाणा सांगून खोळंबा करते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे. याबाबत सदर अंगणवाडी सेविकेला विचारणा केली असता दुसऱ्या अंगणवाडीच्या सेविका असभ्य वर्तन करून टाळाटाळीची उत्तरे देतात. आपण काय बोलतो याचेच भान त्यांना राहत नाही तर मुले काय शिकणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. सर्वच अंगणवाडी केंद्रात अनेक समस्या असून त्या स्वत: अंगणवाडी सेविकांनीच निर्माण केल्या आहेत. बालकांना परिपूर्ण आहार मिळत नाही. खोटे बिल दाखवून शासनाचा पैसा लाटला जात आहे. बोगस बिले तयार करण्यात या अंगणवाडी सेविका अगदी कुशल असल्याचे बोलले जाते. संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळेच असे प्रकार घडत असून चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी गोंदिया, पंचायत समितीचे सभापती व खंडविकास अधिकारी व भ्रष्टाचार निर्मूलन समिती अर्जुनी-मोरगाव यांना लेखी पत्र देवून नागरिकांनी कारवाईची मागणी केली आहे. (वार्ताहर)