शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: सुनेत्रा पवार यांना जर भाजप मुख्यमंत्री करणार असेल तर... - संजय राऊत
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
8
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
9
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
10
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
11
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
12
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
13
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
14
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
15
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
16
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
17
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
18
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
19
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
20
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
Daily Top 2Weekly Top 5

उपसरपंचाच्या खुनातील आरोपीला जन्मठेप

By admin | Updated: September 16, 2015 02:26 IST

कटंगीकला येथील माजी उपसरपंच व काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते अजित प्रभुदयाल सिंग (५०) यांचा ...

गोंदिया : कटंगीकला येथील माजी उपसरपंच व काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते अजित प्रभुदयाल सिंग (५०) यांचा ९ एप्रिल २०१३ च्या दुपारी १२ वाजता गावातील स्मशानघाटात कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करणाऱ्या गावातीलच ब्रिजलाल फत्तेसिंग बनोटे (३५) या मारेकऱ्याला जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.गावातील चैतराम नांदने या इसमाच्या अंत्यसंस्कारासाठी अजितसिंग कटंगीटोला येथील फुटका तलावावरील स्मशानभूमीत गेले होते. यावेळी गावातील फत्तेसिंग बनोटे हा तिथे कुऱ्हाड घेऊन आला व डोक्याच्या मागील भागावर त्याने कुऱ्हाडीने वार केले. यात गंभीर जखमी होऊन अजितसिंग कोसळले. उपस्थित गावकऱ्यांनी त्यांना लगेच उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. परंतू काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. मजुरीचे पैसे अजितसिंगने न दिल्यामुळे ब्रिजलालने त्यांचा खून केला होता. प्रदीप प्रभुदयाल सिंग (५७) यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायालयात प्रमुख जिल्हासत्र न्यायाधिश एम.जी. गीरटकर यांनी सुनावणी केली. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. विणा बाजपेयी यांनी काम पाहिले. या प्रकरणातील आरोपी ब्रिजलाल बनोटेला जन्मठेप व एक हजार रूपये दंड ठोठावला आहे. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांनी केला होता. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे महेश महाले, सहाय्यक फौजदार राजकुमार कराडे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)