शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेप्रमाणे अधिकारीही लेट

By admin | Updated: January 2, 2017 00:44 IST

आमगाव रेल्वे स्थानकाचे निरीक्षण करण्यासाठी येणारे रेल्वे महाप्रबंधक रेल्वे सेवेप्रमाणे स्वत:ही एक तास उशिरा पोहचले.

आमगाव : आमगाव रेल्वे स्थानकाचे निरीक्षण करण्यासाठी येणारे रेल्वे महाप्रबंधक रेल्वे सेवेप्रमाणे स्वत:ही एक तास उशिरा पोहचले. तर रेल्वेचे निरीक्षण करताना त्यांनी ट्रॅकवरच निरीक्षण करू परतीचा मार्ग धरला. अधिकारी उशिरा येऊन एक तास प्रतिक्षेत असलेल्या आमदारांना थांबा दिल्याने आमदारांनी महाप्रबंधकांची कान उघाडणी केली. आमगाव रेल्वे स्थानकांचे निरीक्षण करण्यासाठी महाप्रबंधक सत्येंद्रकुमार आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह स्थानकात आले. दिलेल्या वेळेच्या एक तास उशिरा आलेल्या महाप्रबंधकांनी समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना महत्व न देता अगोदर जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर पुढील एक तासानंतर रेल्वे ट्रॅकवर तपासणी करून निरीक्षण पूर्ण केल्याचा देखावा केला. त्यामुळे रेल्वे स्थानकाबाबत समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. आमगाव, सालेकसा, धानोली या रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांचे निवेदन घेऊन आलेल्या नागरिकांना महाप्रबंधकांनी स्वत: आलेल्या रेल्वे कोचजवळ बोलावून समस्यांचे निवेदन स्विकारले. यावेळी रेल्वे समितीचे सदस्य जगदिश शर्मा, यशवंत मानकर, कमलेश चुटे, नरेंद्र बाजपेई, चंपालाल भुतडा, पुरूषोत्तम सोमवंशी, राजीव मोदी, विनय अग्रवाल, घनश्याम अग्रवाल, बाळु भुजाडे, मनोज सोमवंशी, क्रिष्णा चुटे, राकेश शेंडे, रुपकुमार शेंडे, प्रदीप बिसेन, उत्तम नंदेश्वर यांनी रेल्वेतील विविध समस्यांचे निवेदन रेल्वे महाप्रबंधक सत्येंद्रकुमार यांना देऊन मागणी पूर्ण करण्याची विनंती केली. यावेळी आमदार संजय पुराम यांनी बाम्हणी, धानोली रेल्वे क्रॉसींग मार्गावरून जाणारा रस्ता नागरिकांना आवागमनसाठी सोईचा व्हावा यासाठी त्या मार्गाच्या बांधणी करीता रेल्वे विभागाला सुचना करून निर्णय घेण्यासाठी पत्र सोपविले. आमगाव, सालेकसा व डोंगरगड रेल्वे मार्गावर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता दरम्यान प्रवाशांना प्रवासी वाहतुकीसाठी लोकल गाडी सुरू करण्याची मागणी नागरिक प्रतिनिधी मंडळाने महाप्रबंधकांना लेखी पत्राद्वारे केली. आमगाव रेल्वे स्थानकात आलेले रेल्वे महाप्रबंधक सत्येंद्रकुमार यांनी आमदार पुरामसह नागरिक प्रवासी प्रतिनिधी मंडळाचे रेल्वे फलाटावरूनच निवेदन स्विकारून परतीचा मार्ग घेतला. त्यामुळे नागरिकांनी रेल्वेच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त केला. (शहर प्रतिनिधी) रेल्वेच्या समस्यांवर समाधान नाही आमगाव रेल्वे स्थानकासह सालेकसा, गुदमा, धानोली या रेल्वे स्थानकावर असलेल्या समस्या, आमगाव व गोंदिया मार्गावरील रेल्वे उड्डाणपुल, धानोली, बाम्हणी पायवट रस्ता निर्माण, दुपारपाळीतील प्रवाशांकरीता लोकल गाडी चालविण्याच्या मागणीकडे रेल्वे विभागाने गंभीरतेने घेतले नाही. अनेक वर्षापासून महत्वाच्या मागण्यांकडे निर्णय होत नसल्याने या समस्यांवर समाधान दिसून येत नाही. रेल्वे रुळ ओलांडून महाप्रबंधकांची भेट आमगाव रेल्वे स्थानकात निरीक्षणासाठी आलेले महाप्रबंधक सत्येंद्रकुमार यांनी रेल्वे समिती, आमदार, नागरिक प्रवासी प्रतिनिधी यांना रेल्वे फलाटावर बोलावले. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे पुलाचा सल्ला न देता रेल्वे रुळ ओलांडून येण्याची सुचना केली. त्यामुळे महाप्रबंधकाच्या भेटीसाठी त्यांच्याच नजरेसमोरुन आमदारांसह नागरिक प्रतिनिधीमंडळाने रेल्वे रूळ ओलांडून महाप्रबंधकाची भेट घेतली. परंतु याप्रसंगी सुरक्षेलाही छेद लावण्यात आले.