शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जनमैत्रीमुळे गुन्ह्यांवर बसणार आळा

By admin | Updated: September 2, 2014 23:52 IST

पोलीस विभाग व लॉयन्स क्लब गोंदिया रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने जनमैत्रीची स्थापना करण्यात आली. जनमैत्रीच्या स्थापनेमुळे पोलीस व जनता यांच्यात मधूर संबंध स्थापित होतील. आता वाढत्या गुन्ह्यांवर

गोंदिया : पोलीस विभाग व लॉयन्स क्लब गोंदिया रॉयल यांच्या संयुक्त विद्यमाने जनमैत्रीची स्थापना करण्यात आली. जनमैत्रीच्या स्थापनेमुळे पोलीस व जनता यांच्यात मधूर संबंध स्थापित होतील. आता वाढत्या गुन्ह्यांवर आळा बसविण्यासाठी पोलीस सामान्य जनतेला मित्र बनवेल, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांनी केले.या जनमैत्रीच्या स्थापनेमुळे सामान्य जनता गुन्ह्याशी संबंधित माहिती सरळ पोलिसांना देवू शकेल. जनतेला योग्य न्याय मिळेल तर पोलिसांची प्रतिमा जनतेच्या मनात चांगली निर्माण होईल. जनमैत्रीच्या पुढाकाराने पोलिसांची भीती जनतेच्या मनातून दूर होईल व दोघांत मैत्री वाढेल. नखाते यांच्यानुसार, पोलीस मैत्रीच्या सदस्यांना ओळखपत्रही दिले जाईल. गुन्ह्याची माहिती देणारे व गुन्हेगारांना पकडण्यासाठी मदत करणाऱ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देवून सन्मानित केले जाईल. लॉयन्स क्लब गोंदिया रॉयल पोलिसांच्या सहकार्याने आठ ठिकाणी होर्डिंग्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या होर्डिंग्सवर सामान्य जनतेसाठी गुन्ह्यापासून सुरक्षा व सतर्कता बाळगण्याचे उपाय लिहिले आहेत. तसेच कोणत्याही घटनेची माहिती देण्यासाठी मोबाईल नंबरही देण्यात आले आहेत. शहरातील पहिल्या होर्डिंग्सचा अनावरण जयस्तंभ चौकात उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नागपूरचे राजीव खंडेलवाल, चेतन मारवाह, हेमंत आडगावकर, कालुराम अग्रवाल, लॉयन्स क्लब गोंदिया रॉयलचे अध्यक्ष निखील अग्रवाल, अनिष गुप्ता, राहुल अग्रवाल, सुमीत गुप्ता, रोहीत गुप्ता, दिलप्रीत होरा, सुमीत अग्रवाल उपस्थित होते. तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौरे, सदगीर व वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन अशोक अग्रवाल यांनी केले. (प्रतिनिधी)