शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ये भाई जरा देख के चलो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 22:04 IST

शहरातील काही मोजके रस्ते वगळता सर्वच रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे. त्यामुळे नेमके रस्त्यांवर खड्डे की खड्डयात रस्ता असा प्रश्न निर्माण होतो. या खड्डयांमुळे ‘ये भाई जरा देख के चलो’ असे म्हणण्याची वेळ वाहन चालक आणि शहरवासीयांवर आली आहे.

ठळक मुद्देरुग्ण, विद्यार्थ्यांचा प्रवास खड्ड्यांतूनच : वाहन चालकांचे हाल, न.प. व सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळ्यावर हात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील काही मोजके रस्ते वगळता सर्वच रस्त्यावर खड्डेच खड्डे आहे. त्यामुळे नेमके रस्त्यांवर खड्डे की खड्डयात रस्ता असा प्रश्न निर्माण होतो. या खड्डयांमुळे ‘ये भाई जरा देख के चलो’ असे म्हणण्याची वेळ वाहन चालक आणि शहरवासीयांवर आली आहे.बीजीडीब्ल्यू रुग्णालय असो व नमाद महाविद्यालय या मार्गावरील खड्डयांमुळे रुग्णांसह विद्यार्थ्याना सुध्दा खड्डयांमधून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डयांमुळे जीवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे ना प्रशासनाचे ना लोकप्रतिनिधींचे लक्ष आहे.मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील महानगरपालिका आणि नगर पालिकातंर्गत येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डयांची गांर्भियाने दखल घेतली. यावरुन राज्य सरकारला चांगलेच फटकारले. रस्त्यांवरील खड्डयांची डागडुजी करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे. यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश दिले. गोंदिया शहरात सुध्दा यापेक्षा वेगळे चित्र नाही. रस्त्यांवरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे पाठीच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अर्धा कि.मी.च्या रस्त्यावर तीस ते चाळीस खड्डे असल्याने रस्त्यावरुन वाहने चालविणे कठिण झाले आहे. यासर्व गोष्टींची दखल घेवून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. शहरातील मुख्य मार्गावरील रस्त्यांची खड्डयांमुळे चाळणी झाली आहे. शहरातील सिव्हिल लाईन, मामा चौक, मनोहर चौक, जयस्तंभ चौक, पाल चौक, रेल्वेस्टेशन रोड, कुडवा चौक, श्री टॉकीज चौक, नमाद महाविद्यालय परिसर, बीजीडब्ल्यू रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर खड्डेच खड्डे पडले आहे. खड्डयांमुळे रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेणाऱ्या रुग्णांना सुध्दा या खड्डयातूनच प्रवास करावा लागत आहे. या खड्डयांमुळे एखाद्या वेळेस एखादा गंभीर आजाराचा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाल चौकातून नमाद महाविद्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठे मोठे खड्डे पडले आहे. ऐवढेच नव्हे तर खड्डे पडून सळाखी बाहेर आल्या आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मात्र याकडे ना नगर परिषदेचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचे त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी नेमकी कुणाची असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.उड्डाणपुलावरील खड्डा जीवघेणाशहरातील नवीन उडाण पुलाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला असून सळाख बाहेर आली आहे. या उड्डाणपुलावरुन दिवसभर वाहनांची वर्दळ असते. या खड्डयामुळे उड्डाण पुलावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली. मात्र त्यांनी अद्यापही दखल घेतली नाही. परिणामी रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याचे चित्र आहे.मुख्य रस्त्यांची दुर्दशाशहरातील रस्त्यांसह मुख्य मार्गांची सुध्दा दुर्दशा झाली आहे. हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येतात. मात्र या खड्डयांकडे अद्यापही या विभागाचे लक्ष गेले नाही. खड्डयांमुळे एक दोन वाहन चालकांचा बळी गेल्यानंतर हा विभाग खड्डयांची दखल घेणार का? असा सवाल शहरवासीय उपस्थित करित आहेत.खड्डयांचा फटका सर्वांनाचशहरातील रस्त्यांवरील खड्डयांचा फटका केवळ वाहन चालक, विद्यार्थी किंवा रुग्णांना बसत नसून लोकप्रतिनिधी आणि पुढाऱ्यांनासुध्दा बसत आहे. त्यांनी देखील या खड्डयांवर रोष व्यक्त केला. मात्र कुणी यासाठी पुढे येऊन बोलत नसल्याचे आश्चर्य आहे.खड्डयांवरील चुरी गायबनगर परिषदेने पावसाळ्यात शहरातील काही मार्गावरील खड्डे चुरी टाकून बुजविले होते. पण, अल्पावधीतच रस्त्यांचे जैसे थे हाल झाले आहे. त्यामुळे खड्डयांवरील चुरी नेमकी गेली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील रस्त्यांची दुरूस्ती व नवीन रस्त्यांच्या बांधकामासाठी २३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. येत्या आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होवून रस्ते दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात येईल.- चंदन पाटील,मुख्याधिकारी न.प.गोंदिया.सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत येणाºया रस्त्यांवरील खड्डे त्वरीत बुजविण्यात येईल. उड्डाण पुलावर खड्डा बुजविण्याचे निर्देश संबंधिताना देऊन ही समस्या मार्गी लावू.- सोनाली चव्हाणकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.