शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
2
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
3
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
4
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
5
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
6
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
7
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
8
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
9
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
10
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार
11
राज्यातील तब्बल आठ हजारांहून अधिक गावांत शाळाच नाही; केंद्राने शैक्षणिक परिस्थिती सुधारण्याचे दिले निर्देश
12
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
13
ज्योती मल्होत्रा ​​आणि अरमान यांचा पाकिस्तानशी किती खोल संबंध? हरियाणा पोलिसांचा खुलासा
14
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
15
मुख्य सचिव, पोलिसप्रमुख स्वागताला न आल्याने सरन्यायाधीश गवई नाराज; करून दिली प्रोटोकॉल, अनुच्छेद १४२ची आठवण
16
भीक मागितली, रस्त्यावर झोपला अन्..; अभिनेत्याची अवस्था पाहून चाहत्यांना धक्का, काय घडलं नेमकं?
17
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
18
‘लष्कर’ कमांडर सैफुल्लाह याचा पाकिस्तानमध्ये ‘गेम’; नागपूरच्या संघ मुख्यालय हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार
19
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
20
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-

काम होऊ दे, नववर्ष सुखाचे जाऊ दे!

By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST

वर्ष २०१५ गेले आणि २०१६ या नववर्षाचा पहिला दिवस शुक्रवारी उजाडला. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र नवीन

गोंदिया : वर्ष २०१५ गेले आणि २०१६ या नववर्षाचा पहिला दिवस शुक्रवारी उजाडला. मागील वर्षात झाले ते झाले, मात्र नवीन वर्ष सुखा-समाधानाचे जावे यासाठी गोंदिया शहरासह जिल्हाभरातील नागरिकांनी देवाच्या दरबारी धाव घेतली. त्यामुळे शुक्रवारी सर्व धार्मिक स्थळांवर भाविकांची एकच गर्दी दिसून आली. मागील वर्षात काही चांगले तर काही वाईट अनुभव आले. गुन्हेगारी, खून, अत्याचार यासारख्या घटनांनी मागचे वर्ष गाजले व कलंकितही झाले. सोबतच दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे वाढलेला त्रास ही सर्व देशावरची संकटे आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात यंदा झालेला कमी पाऊस व त्यामुळे हातून गेलेले पीक , अपघात व गुन्हेगारी घटनांनीही जिल्हा गाजला. एकंदर मागील वर्षात रोज काही ना काही बरेवाईट ऐकायला आले. मात्र २०१५ या नववर्षात असे काही अभद्र ऐकायला येऊ नये. मागील वर्षी झाले ते झाले, चुकांना पदरात पाडून हे वर्ष कुशल, मंगल झाले पाहीजे अशीच सर्वांची मागणी आहे. आपली ही मागणी देवापुडे मांडण्यासाठी शुक्रवारी (दि.१) नागरिकांनी मंदिर, मस्जीद, गुरूद्वारे व चर्चमध्ये जाऊन आपापल्या प्रार्थना पद्धतीनुसार देवाला साकडे घातले. (शहर प्रतिनिधी)हनुमान मंदिरात एकच गर्दी४शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील हनुमान मंदिराची शहरासह लगतच्या परिसरातही ख्याती आहे. जागृत मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जात असून नेहमीच या मंदिरात गर्दी असते व दूरवरून लोकं येथे हनुमंताच्या दर्शनासाठी येतात. नववर्षाचा पहिला दिवस असल्याने हनुमंताला पूर्ण वर्ष सुख,समाधानाचे जावे हे साकडे घालण्यासाठी शुक्रवारी नागरिकांनी एकच गर्दी केली. सकाळच्या आरतीपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येत होती. विशेष म्हणजे नववर्षाचे निमित्त साधून मंदिरात हनुमान चालीसा पाठचे आयोजन करण्यात आले होते.न्यू इयर सेलिब्रेशन धार्मिक स्थळांवर४२०१५ ला बाय-बाय करण्यासाठी थर्टीफर्स्टची सेलीब्रेशन पार्टी करून मात्र नवीन वर्षाची सुरूवात देवदर्शनाने करण्याकडे नागरिकांचा कल दिसला. नवीन वर्षात सुख,स् ामृद्धी व समाधान लाभावे यासाठी देवाला साकडे घालून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. त्यानुसार सकाळपासून अगोदर घरातील थोरामोठ्यांचे चरणस्पर्श करून व त्यानंतर आपापल्या धर्मस्थळांवर जाऊन नागरिकांनी आपल्या इष्ट देवाचा आशीर्वाद घेण्यास पसंती दर्शविली. यामुळेच हॉटेल्समध्ये गर्दी असतानाच धार्मिक स्थळांवरही नागरिकांची गर्दी बघावयास मिळाली.