शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

दोन सरकारांच्या कारभारात पुजारीटोला धरणाकडे पाठ

By admin | Updated: May 16, 2017 01:04 IST

सिंचनाची सोय करण्यासाठी सालेकसा तालुक्यात पुजारीटोला धरणाची निर्र्मिती १९६८ ला करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबिजेवार : सिंचनाची सोय करण्यासाठी सालेकसा तालुक्यात पुजारीटोला धरणाची निर्र्मिती १९६८ ला करण्यात आली. या धरणाच्या देखरेखीची जबाबदारी महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकारकडे देण्यात आली. परंतु हेवेदावे सुरू झाल्यामुळे या धरणाकडे दोन्ही सरकारच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. परिणामी पुजारीटोला धरणावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या थांबली. पावसाळ्याच्या दिवसात पर्यटकांना आकर्षीक करणारे पुजारीटोला धरण वाघनदीवर बांधण्यात आले. हे धरण लहान असले तरी या धरणाला शिरपूरबांध या धरणाची साथ आहे. धरण तयार केल्यापासून येथे पर्यटकांची संख्या दररोज संख्या वाढत होती. सुरूवातीला या धरणाजवळ बाग तयार करण्यात आली होती. परंतु बागेकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही बाग उजाड झाली. या धरणाचे पाणी महाराष्ट्र व मध्यप्रदेशात जात असल्याने या धरणाच्या सौंदर्यीकरणाची जबाबदारी दोन्ही शासनावर होती. या ठिकाणी मध्यप्रदेश शासनाने विश्रामगृह तयार केले होते. परंतु तयार केल्यापासून त्या विश्रामगृहाची देखभाल दुरूस्ती न केल्यामुळे आज ते विश्रामगृह मृत्यूशय्येवर आहे. महाराष्ट्रात मध्यप्रदेश सरकारचे विश्रामगृह जीर्णावस्थेत आहे. या ठिकाणी सानने बाग तयार करायला हवे. मुलांसाठी झुले, घसरण पट्या तयार करून येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी पोषक वातावरण तयार करण्याची गरज आहे. आठ वर्षापूर्वी या धरणावरील बागेसाठी असलेले मोटारपंप बंद पडले तेव्हापासून बाग उजाडली. एकदा बंद पडलेले मोटारपंप आजही बंदच आहे. १३ दरवाजे असलेले पुजारीटोला धरण पर्यटकांना आकर्षीत करते. मात्र येथे आलेल्या पर्यटकांना बसण्यासाठी जागा नाही. खाण्यापिण्यासाठी काही स्टॉल नाही, मुलांना खेळण्यासाठी साहित्य नाही यामुळे निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या पुजारीटोला धरणावर आलेल्या पर्यटकांना जास्त काळ घालवणे कठिण जाते. या धरणाच्या देखरेखीसाठी दरवर्षी पैसे येतात. ते पैसे उचचले जाते परंतु त्या धरणावर काहीच विकास कामे केले जात नाही. या धरणाकडे मध्यप्रदेश सरकार बारेबर महाराष्ट्र सरकानेही पाठ फिरवली आहे. आजघडीला परिसरातील विलोभनीय निसर्गरम्य हे परिसर आज उपेक्षित आहे.