शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात माल्ही परिसरात बिबट मृतावस्थेत आढळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 19:56 IST

Gondia News तिरोडा तालुक्यातील वडेगाव माल्ही परिसरातील एका नाल्याजवळ एक बिबट मृतावस्थेत आढळल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

ठळक मुद्देमृत्यूचे कारण अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तिरोडा तालुक्यातील वडेगाव माल्ही परिसरातील एका नाल्याजवळ एक बिबट मृतावस्थेत आढळल्याची घटना बुधवारी (दि.१९) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान गावकऱ्यांनी घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. 

प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील वडेगाव माल्ही परिसरातील नाल्या लगत असलेल्या मैदानावर माल्ही येथील मुले बुधवारी क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांना नाल्यालगत एक बिबट मृतावस्थेत आढळला. त्यांनी याची माहिती सरपंच व गावकऱ्यांना दिली. यानंतर सरपंच व गावकरी घटनास्थळी पोहचले व या घटनेची माहिती तिरोडा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. ज्या ठिकाणी बिबट मृतावस्थेत आढळला तो परिसर कोडेलाेहारा बीट अंतर्गत येत असून या परिसरात वनविभागाची नर्सरी आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बिबट्याचा मृत्यू हा तीन चार दिवसांपूर्वीच झाल्याचे बोलल्या जाते. माल्हीचे सरपंच संजय रहांगडाले यांनी याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी आकरे यांना दिली. त्यांनी लगेच वनरक्षक व एका चौकीदाराला घटनास्थळी पाठविले होते. मात्र सायंकाळी उशीर झाल्याने मृत बिबट्याचे श्वविच्छेदन करण्यात आले नव्हते. त्यामुळे बिबट्याचे मृत्युचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

टॅग्स :leopardबिबट्या