शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सावकारांनी कर्जग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्वरित सादर करावे-सूर्यवंशी

By admin | Updated: June 3, 2015 01:13 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

गोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी ज्या परवाना धारक जिल्ह्यातील सावकारांकडून ३० नोव्हेंबर २०१५ पूर्वी कर्ज घेतले असल्यास ३० जून २०१५ पर्यंतचे कर्ज व त्यावरील शासनाने निर्धारित केलेल्या दराने व्याज संबंधित सावकाराला शासनाद्वारे परत करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी सावकाराच्या कर्जातून मुक्तता होणार आहे.लाभार्थी शेतकऱ्यांकडे सातबारा असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने स्वत: कर्ज न घेता त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने सावरकाराकडून कर्ज घेतले असले तरी असे शेतकरी हे या योजनेचा लाभ घेवू शकतील. ज्या सावकाराकडून कर्ज घेतले आहे तो सावकार महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ नुसार परवानाधारक असणे आवश्यक आहे. परवानाधारक सावकाराकडून कर्ज घेतलेलफी पगारदार व्यक्ती, निवृत्तीवेतनधारक व्यक्ती व मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ नुसार परवानाधारक व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र राहणार नाही.जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांनी कर्जदार शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कर्जदार सदस्याशी संपर्क करुन त्याचे प्रस्ताव सहायक निबंधक, सहकारी संस्था या कार्यालयामध्ये सादर करावे. प्राप्त झालेल्या प्रस्तावाची छाननी तालुका पातळीवरील गठीत समितीद्वारे करण्यात येईल. तालुकास्तरीय गठीत समितीमध्ये तहसीलदार हे अध्यक्ष, सहकारी संस्थेचे लेखापरिक्षक हे सदस्य आणि सहायक निबंधक हे सदस्य सचिव असून या समितीने छाननी करुन शिफारस केलेल्या कर्जमाफीच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात येईल. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असून जिल्हा पोलीस अधीक्षक व सहकारी संस्थुेचे विशेष लेखा परीक्षक हे सदस्य आहे. जिल्हा उपनिबंधक हे सहकारी संस्थाचे सदस्य सचिव आहेत.परवानाधारक सावरकारांनी शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्वरित सहायक निबंधक कार्यालयामध्ये सादर करावे. योजनेच्या अंमलबजावणीत हयगय झाल्यास संबंधित सावकाराविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)