शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

धानविक्रीपोटी लाखो रुपये थकीत

By admin | Updated: May 25, 2015 01:16 IST

आधारभूत धान खरेदी केंद्रावर नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकीत आहेत. आता खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांच्या गरजा वाढल्या.

साकोली : आधारभूत धान खरेदी केंद्रावर नियोजनाच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकीत आहेत. आता खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांच्या गरजा वाढल्या. अशात धान खरेदी केंद्रातील थकबाकी कधी मिळेल, याबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.महाराष्ट्र को-आॅप. मार्केटींग फेडरेशनच्या सब एजन्ट म्हणून येथील श्रीराम भात गिरणी हमीभाव धान खरेदी केंद्र चालविते. २०१४-१५ या वर्षातील खरेदी हंगामात चार कोटी ११ लाख ३० हजार ३४४ रुपये किंमतीच्या धानाची खरेदी केली. सध्या उन्हाळी धानाची खरेदी सुरु आहे. मागील महिन्यात सुमारे ३० हजार रुपये किंमतीच्या धानाची खरेदी केली. सध्या उन्हाळी धानाची खरेदी सुरु आहे. मागील महिन्यात सुमारे ३० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्याचे ६८ लाख रुपये शेतकऱ्यांना येणे आहे. सर्वसाधारण प्रतीचे धान १,३६० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी सुरु आहे.श्रीराम सहकारी भातगिरणी येथे दररोज ७०० ते ८०० क्विंटल धानाची आवक सुरु आहे. यातील जवळपास ५०० क्ंिवटल धानाचे रोज मोजमाप होते. त्यामुळे रोज येणाऱ्या शेतकऱ्यांना मोजणीसाठी दुसऱ्या व तिसऱ्या दिवसांपर्यंत थांबून राहावे लागत आहे. परिसरातील शेतकऱ्यांसाठी हेच एकमेव आधारभूत धान खरेदी केंद्र असल्यामुळे येथे शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. त्यातच निकटवर्तीय व कुटूंबातील सदस्यांच्या लग्नसमारंभासाठी जाण्याचीही लगबग सुरु आहे. रोजची आवक वाढत असल्याने खरेदी केंद्राच्या आवारात धानाच्या पोत्यांचे ढीग लागले आहेत. विक्रीसाठी आणलेल्या धानाचे लवकर मोजमाप व्हावे, या अपेक्षेने येणाऱ्या शेतकऱ्यांना येथे ताटकळत राहावे लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी एकोडी व पळसगाव येथे आधारभूत धान खरेदी केंद्र सुर करावे. अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या केंद्रात धान विकणाऱ्या शेतकऱ्यांची आतापर्यंत ६८ लाख रुपयांची थकबाकी आहे. (तालुका प्रतिनिधी)