शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

केटीएसचा कारभार अस्थायी डॉक्टरकडे

By admin | Updated: August 14, 2014 23:47 IST

शासनाच्या प्रत्येक विभागात पद व सेवाजेष्ठतेला प्राधान्य दिले जाते. परंतु गोंदियाच्या आरोग्य विभागात सेवाजेष्ठतेला किंवा पदवीला मागे टाकून चक्क अस्थायी असलेल्या डॉक्टरला मागील

अजब कारभार : वर्ग एकच्या पाच अधिकाऱ्यांना डावललेगोंदिया : शासनाच्या प्रत्येक विभागात पद व सेवाजेष्ठतेला प्राधान्य दिले जाते. परंतु गोंदियाच्या आरोग्य विभागात सेवाजेष्ठतेला किंवा पदवीला मागे टाकून चक्क अस्थायी असलेल्या डॉक्टरला मागील दिड ते दोन वर्षापासून केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालायाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत ठेवण्यात आले. यामध्ये कोणाचा ‘इंटरेस्ट’ आहे याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.कुंवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालयात प्रथम वर्गाचे पाच अधिकारी असताना निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची धुरा अस्थायी डॉक्टर अनिल परियाल यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मागील दीड ते दोन वर्षापासून ते निवासी वैद्यकीय अधिकारी पद सांभाळत आहेत. शासनाने त्यांना ११ महिन्यांच्या बॉंडवर ठेवले आहे. केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथम वर्गाचे डॉ.राजेंद्र जैन, डॉ. पालीवाल, डॉ.राज वाघमारे कार्यरत आहेत. याशिवाय बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात डॉ. संजीव दोडके व डॉ. अमरीश मोहबे हे पाच डॉक्टर प्रथम वर्गाचे असताना त्यांच्यावर निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची धुरा न देता ११ महिन्यांच्या बाँडवर असलेल्या अस्थायी डॉ. अनिल परियाल यांच्या खांद्यावर ही धुरा सोपविली आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे प्रथम वर्गाचा वैद्यकीय अधिकारी यांच्यावरच ही जबाबदारी देणे आवश्यक असते. परंतु त्यांना डावलून अस्थायी अधिकाऱ्याकडे निवासी वैद्यकीय अधिकारीपदाचा कारभार देणे, ही बाब चर्चेचा विषय झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रवि धकाते यांची असली तरी ही नियुक्ती आरोग्य उपसंचालकांनी केली असल्यास त्यांनी कोणत्या आधारावर ही नियुक्ती केली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (तालुका प्रतिनिधी)