शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

गोंदिया रेल्वे स्थानकावर किड्स झोन

By admin | Updated: January 21, 2017 00:11 IST

प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर गाडीला उशीर होत असेल तर प्रवासी कसेतरी ताटकळत वेळ काढतात.

पालकांना दिलासा : प्रवाशांच्या मुला-मुलींसाठी मिळणार सुविधा देवानंद शहारे   गोंदिया प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर आल्यानंतर गाडीला उशीर होत असेल तर प्रवासी कसेतरी ताटकळत वेळ काढतात. पण त्यांच्यासोबत असलेल्या बालकांना मात्र हा वेळ काढणे कठीण जाते. त्यांना मोकळे खेळताही येत नाही. पण आता ही अडचण दूर होणार आहे. बालकांच्या मनोरंजनासाठी आता गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर खास ‘किड्स झोन’ तयार केला जाणार आहे. या किड्स झोनमध्ये रेल्वे प्रवाशांच्या बालकांसाठी खेळण्यातील हत्ती, घोडे व इतर खेळांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिनाभराच्या कालावधीत हे खेळ साहित्य उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांचा वेळ आनंदात जाणार आहे. गोंदिया रेल्वे विभागाला नुकतेच रेल्वे बोर्डाकडून एक पत्र मिळाले आहे. या पत्रात रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांच्या ० ते ७ वर्षे वयोगटातील बालकांसाठी खेळ साहित्य लावण्याच्या उद्देशाने जागेचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानंतर आता जागा शोध अभियान रेल्वे अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर सात प्लॅटफॉर्म आहेत. यापैकी कोणत्या प्लॅटफॉर्मवर ही सुविधा उपलब्ध करण्यात येईल, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र जागेचा विचार केल्यास होमप्लॅटफॉर्मवरच जागा खाली असल्याचे आढळते. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म- ३ व ४ वरून सर्वाधिक गाड्या चालतात. या प्लॅटफार्मवर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात राहते. ही बाब लक्षात घेता सर्वात आधी प्लॅटफार्म-३ व ४ वर ही सुविधा उपलब्ध केली जावू शकते. तसेच या प्लॅटफार्मवरील आरोग्य विभागाला त्यांचे कार्यालय खाली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तेथे द्वितीय श्रेणीचे प्रवासी प्रतीक्षालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. याच ठिकाणी हे खेळ साहित्य उपलब्ध करून देण्याची शक्यता अधिक आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या मुलांना खेळण्यासाठी किड्स झोनचे निर्माण व खेळ साहित्य उपलब्ध करून देण्याची सुविधा दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात सर्वात आधी गोंदिया रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून दिली जात आहे. परंतु यापूर्वी रायपूर रेल्वे स्थानकावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी तेथील एका दानदात्याने पुढाकार घेतला आहे. ३० हजार रूपये किमतीचे खेळ साहित्य त्या दानदात्याने तेथे स्वत:कडून उपलब्ध करून दिले आहेत. गोंदियातसुद्धा दानदात्यांची मदत घेतली जावू शकते किंवा रेल्वे सदर खेळ साहित्य उपलब्ध करून देईल, याबाबत गोंदियाचे रेल्वे अधिकारी अनभिज्ञ आहेत. रेल्वे बोर्डाकडून पत्र मिळाले आहे. प्रवाशांच्या मुलामुलींना खेळण्यासाठी ही सुविधा द्यायची आहे. आणखी काही निर्देशांची प्रतीक्षा आहे. यानंतरच सर्व बाबी स्पष्ट होतील. सध्या जागेचा शोध घेणे सुरू आहे. -मुकेश कुमार स्टेशन व्यवस्थापक (वाणिज्य) रेलवे स्टेशन, गोंदिया