शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ९१ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 21:26 IST

मृग नक्षत्राचा पाऊस पडताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. खरीप हंगाम सुरू होण्यास दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले असून यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार आहे. त्या दृष्टीने खते, बियाणांचे सुध्दा नियोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देलागवड क्षेत्रात वाढ : ६२ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृग नक्षत्राचा पाऊस पडताच शेतकरी पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. खरीप हंगाम सुरू होण्यास दोन महिन्याचा कालावधी शिल्लक असला तरी कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले असून यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार आहे. त्या दृष्टीने खते, बियाणांचे सुध्दा नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यात एकूण २ लाख २० हजार २४६ हेक्टर क्षेत्र लागवड योग्य आहे. तर यापैकी ९८ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. जिल्ह्यातील एकूण लागवड योग्य क्षेत्रापैकी यंदा १ लाख ९१ हजार ७१५ हेक्टरवर धानासह इतर पिकांची लागवड केली जाणार आहे. तर मागील वर्षी १ लाख ५२ हजार २५० हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुुलनेत यंदा लागवड क्षेत्रात ४८ हजार ४१३ हेक्टरने वाढ झाली आहे.जिल्ह्यात सरासरी ११३४ मि.मी.पाऊस पडत असल्याने धानाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकाला सरासरी ९०० ते १००० मि.मी.पावसाची गरज असते. तर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि मामा तलावांची सुध्दा शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठी मदत होते.त्यामुळे शेतकरी इतर पिकांऐवजी धान लागवडीवर अधिक भर देतात. तर खरीपानंतर रब्बी हंगामातही जवळपास २८ हजार हेक्टरवर धानाची लागवड केली जाते. धानासह, तूर, मुंग, उडीद या पिकांची सुध्दा लागवड केली जाते. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि किटकनाशकांच्या टंचाईला तोंड द्यावे लागू नये यासाठी त्यांचे सुध्दा नियोजन कृषी विभागाने केले आहे.खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या ७१ हजार मेट्रीक टन खताची तर ६२ हजार ५४० क्विंटल धानासह इतर बियाणांची मागणी कृषी विभागाने केली आहे.यापैकी काही प्रमाणात खते आणि बियाणे उपलब्ध सुध्दा झाल्याची माहिती आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस झाल्यास धानाच्या हेक्टरी उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.