शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पीक कर्ज वाटप शेतकरी मेळावा

By admin | Updated: June 16, 2016 02:23 IST

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या खरीप पीक कर्ज वाटप कार्यक्रमाचा दुसरा टप्पा तालुक्यात बारा गावात शिबिर घेऊन यशस्वी करण्यात येत आहे.

आमगाव : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या खरीप पीक कर्ज वाटप कार्यक्रमाचा दुसरा टप्पा तालुक्यात बारा गावात शिबिर घेऊन यशस्वी करण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी याचा फायदा घेण्याकरिता शेतकरी मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन तहसीलदार राठोड यांनी केले आहे. तहसील कार्यालय आमगावच्या वतीने खरीप पीक कर्ज वाटपाचा दुसरा टप्पा व शेतकरी मेळावा १४ ते ३० जूनपर्यंत तालुक्यातील बारा गावात आयोजित करण्यात आला आहे. त्यात किकरीपार अंतर्गत कट्टीपार, नवेगाव, डोंगरगाव, धामणगाव येथे १४ जून, भोसा अंतर्गत बोदा, कालीमाटी, मुंडीपार, टाकरी, टेकरी, बंजारीटोला, मानेकसा, रामजीटोला येथे १५ जून, नंगपूरा अंतर्गत सरकारटोला, गोसाईटोला, ननसरी, मरारटोला येथे १७ जून, सितेपार अंतर्गत मोहगाव, करंजी, कातुर्ली, सुपलीपार येथे २० जून, गिरोला अंतर्गत घाटटेमनी, बनियाटोला येथे २० जून, जवरी अंतर्गत शिवणी, चिरचाळबांध, खुर्शीपार, बासीपार, बुराडीटोला, शिवनटोला, भजियापार, खुर्शीपारटोला येथे २२ जून, बोथली अंतर्गत ठाणा, गोरठा, धावडीटोला, मक्कीटोला, ठाणाटोला येथे २३ जून, सुरकुडा अंतर्गत मानेगाव, दहेगाव, धोबीटोला येथे २४ जून, माल्ही अंतर्गत आमगाव, बनगाव, महारीटोला, चिचटोला, कुंभारटोली, शंभुटोला, सावंगी, पदमपूर, बाम्हणी, पिपरटोला, रिसामा, किंडगीपार येथे २७ जून, पानगाव अंतर्गत बोरकन्हार, अंजोरा, कवडी, वळद, रामाटोला, भालीटोला, कटंगटोला, येरमडा, बघेडा येथे २८ जून, सोनेखारी अंतर्गत पिपरटोला, तिगाव, जांभुरटोला, कोपीटोला, कोसमटोला, चिमनटोला, वाघडोंगरी येथे २९ जून, आसोली अंतर्गत फुक्कीमेटा, जामखारी, बिर्सी, नांगटोला, पाटीलटोला, पाऊलदौना येथे २० जून. अशाप्रकारे १४ ते ३० जूनपर्यंत १२ गट मुख्यालयातून शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात तालुक्यातील ८४ गावातील शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटप मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संबंधित गावातील शेतकरी खातेदार यांनी सोबत फोटो, बँक पासबूक, ओखळपत्रात आधार कार्ड, पॅनकार्ड, निवडणूक कार्ड सोबत आणणे गरजेचे आहे. तरी सदर गावातील शेतकऱ्यांना मेळाव्यास ग्रामपंचायत भवनात सकाळी १० वाजता उपस्थित राहणे गरजेचे आहे. सदर गावातील नागरिकांसाठी सदर मेळावा सकाळी १० ते ५ पर्यंत आयोजित केला असल्याचे तहसीलदार राठोड यांनी कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)