शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

केशोरी परिसर औद्योगिक विकासापासून वंचित

By admin | Updated: June 18, 2016 01:12 IST

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी हा परिसर अत्यंत जंगलव्याप्त डोंगराळ आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो.

केशोरी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी हा परिसर अत्यंत जंगलव्याप्त डोंगराळ आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. मोठ्या शहराच्या परिसराचा औद्योगिक विकास साधण्यात राज्य शासन व केंद्र शासन प्रयत्नशील आहे. परंतु केशोरी परिसर उद्योगाच्या विकासापसून वंचित आहे.भारतीय घटनेतील तरतुदीनुसार आदिवासी परिसराचा देखील विकास होणे आवश्यक असताना सुध्दा या परिसराकडे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने पाहिले जात नाही. हा या भागातील सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय आहे. हरितक्रांती, श्वेतक्रांती बरोबरच या भागातील औद्योगिक क्रांती होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र या औद्योगिक क्रांतीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. सत्ताधाऱ्यांनी शहरातील औद्योगिक विकास क्रांतीचा मोठा वाटा उचलला आहे. जो भाग नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला आहे. ज्या ठिकाणी मौल्यवान खनीज व वनसंपत्ती उपलब्ध आहे. त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग या परिसरात निर्माण होऊ नये ही मोठी शोकांतिका समजावी लागेल. या भागातील खनीज व वनसंपत्ती नेऊन दुसरीकडे उद्योग निर्माण करून तेथील लोकांच्या हाताला काम द्यायचे आणि जिथे पिकते तेथील लोकांची हात रिकामे ठेवायचे हा न्याय तर्कसंगत नाही. हा या भागातील नागरिकांवर अन्याय आहे. या परिसरातील औद्योगिक अनुशेष वाढत आहे. त्यामुळे या परिसरातील सुशिक्षीत बेरोजगार परराज्यातील शहराकडे धाव घेतांंना दिसत आहेत. याकडे शासनातील सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन केशोरी परिसराचा औद्योगिक विकास करण्याचा प्रयत्न करावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे. परंतु लोकप्रतिनिधी उदासिन आहेत. (वार्ताहर)