शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मूठभर तांदूळ अन् पाण्याची वाटी, अंगणात ठेवा ना माझ्यासाठी

By admin | Updated: March 20, 2017 00:57 IST

घरात चिमणी आली तर ‘इंटेरियर’ची वाट लागेल, म्हणून तिला हाकलून लावणाऱ्यांना चिऊताईची आळवणी एवढीच आहे, मूठभर तांदूळ अन् वाटीभर पाणी...

देवानंद शहारे  गोंदिया घरात चिमणी आली तर ‘इंटेरियर’ची वाट लागेल, म्हणून तिला हाकलून लावणाऱ्यांना चिऊताईची आळवणी एवढीच आहे, मूठभर तांदूळ अन् वाटीभर पाणी... अंगणात ठेवा ना माझ्यासाठी...’’ चिमण्यांची चिमणी पाखरं लहानसहान किटकांवर वाढतात. हे कीटकही जंतूनाशकांच्या वाढत्या वापरामुळे मरत आहेत. किटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटल्याने त्यावर जगणाऱ्या चिमण्यांना अन्न मिळेनासे झाले अन् त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे चिमण्यांसह एकूणच पक्ष्यांच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होत आहे. शहरात सुरू असलेली प्रचंड वृक्षतोड, शहरीकरणाचा आंधळा वेग चिमण्यांच्या जीवांवर उठला आहे. खरे तर परिसरात जास्तीतजास्त चिमण्यांचे वास्तव्य असले पाहिजे. काँक्रिटच्या जंगलातील वास्तूरचना चिमण्यांसाठी पोषक नाही. जुन्या वह्यांचे पुठ्ठे काढून त्यापासून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करता येतात. ती शाळेच्या परिसरात अन् अंगणात लावता येतात. घर बांधतानाच घरात चिमण्यांसाठी विशिष्ट जागा शिल्लक ठेवता येते. चिमणी हा मनुष्याच्या आसपास राहणारा पक्षी असल्याने त्यांना घराच्या परिसरातच घरट्यासाठी जागा हवी असते. घरटे बांधण्यासाठी योग्य जागा मिळत नाही म्हणून अनेकदा त्या धोक्याच्या ठिकाणी घरटे तयार करतात. त्यामुळे त्यांची अंडी सुरक्षित राहात नाही. योग्य आहाराविना पिल्लांची वाढ योग्यप्रकारे होत नाही. लहानपणी जेवणाचा कंटाळा केला की, आई हमखास दाणा टाकून चिमण्यांना बोलवायची दारात़ मग त्यांचे कौतुक दाखवत एकेक घास भरायची तोंडात़ बालपणी पहिल्यांदा ही अशी ओळख झाली आपली चिऊताईशी! तेव्हापासून ती मनाच्या चौकटीत कायम बसली आहे घरटे करूऩ संगणकाच्या युगातही तिचे आकर्षण कमी झाले असे अजिबात नाही़ परंतु व्यक्तिगत स्वप्ने नक्कीच मोठी झाली अन् या स्वप्नांच्या उंचीशी स्पर्धा आपल्या लाडक्या चिमण्यांना काही करता आली नाही़ याच उंची स्वप्नांनी पुढे त्यांचे घरटेही हिरावून घेतले़ आता तर त्यांना दोन थेंब पाणीही मिळणे दुरापास्त झाले आहे़; म्हणूनच या चिमण्या आपल्याला साद घालत आहेत़ ऐका जरा ती साद अन् आपल्या बालपणाच्या या सोबत्यांना जगविण्यासाठी मूठभर तांदूळ आणि एक पाण्याने भरलेले भांडे ठेवा आपल्या दारात़ चिऊताई म्हणते,‘चिल्यापिल्यांना घास भरवताना मी प्रत्येकच मायबापाच्या मदतीला धावून गेली. आज मला तुमच्या आधाराची गरज आहे. तुम्ही फटाक्यांच्या आवाजाने मला दिवाळीत बधीर केले. संक्रातीला नायलॉनच्या मांजाने माझा गळा कापला. आता आमच्यावर संक्रांत कशाला आणता? मला माहीत आहे. आता इथली जुनी घरे जात आहेत. सिमेंटचे चकाचक जंगल उभे राहात आहे.