शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कलापथकाने केली एड्स जनजागृती

By admin | Updated: March 29, 2017 01:30 IST

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा कलापथकाच्या माध्यमातून ५ ते २४ मार्च दरम्यान जिल्ह्यात

एड्स नियंत्रण संस्थेचा उपक्रम : २० गावांत पोहोचले कलापथक तिरोडा : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा कलापथकाच्या माध्यमातून ५ ते २४ मार्च दरम्यान जिल्ह्यात एचआयव्ही एड्स संबंधी जनजागृतीसाठी कलापथकाची मदत घेतली जात आहे. संस्थेच्या या नवीन उपक्रमांतर्गत कलापथकाने जिल्ह्यातील २० गावांत पथनाट्याच्या माध्यमातून एड्स जनजागृती केली. गेल्या काही वर्षापासून एचआयव्ही एड्सच्या प्रमाणामध्ये घट होत असली तरी नव्याने निघणाऱ्या एचआयव्ही बाधितांच्या संख्येतही घट व्हावी या दृष्टीने समाजात जनजागरणाची आवश्यकता आहे. या हेतूने एचआयव्ही एड्स काय आहे, एड्सपासून स्वत:चे रक्षण कसे करावे. प्रत्येक नागरिकाने व प्रत्येक गरोदर महिलेने आपली एचआयव्ही चाचणी जरुर करावी यासारखे हा संदेश प्रत्येकांपर्यंत जावा व त्यांच्यात एड्सबाबत जनजागृती करता यावी यासाठी एड्स नियंत्रण संस्थेने कलापथकाच्या माध्यमातून जनजागृतीचा नवा उपक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत १५ मार्च रोजी गोंदियाच्या केटीएस सामान्य रुग्णालयातून पथनाट्याला प्रारंभ झाला. आमगाव, सालेकसा, देवरी, चिचगड, अर्जुनी-मोरगाव, सडक-अर्जुनी, गोरेगाव असा प्रवास करीत सदर कलापथक येथे दाखल झाले. तालुक्यातील बिर्शी व लाखेगाव येथे या कलापथकाने शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या पथनाट्यातून एड्स संबंधी जनजागृती केली. या कलापथकाद्वारा जिल्ह्यातील एकूण २० गावांमध्ये एड्ससंबंधी संदेश पोहोचविण्यात आला. अत्यंत शिस्तबद्ध व मंत्रमुग्ध करणाऱ्या पथनाट्याच्या या कलापथकामध्ये वैभव कोलते, विक्रम फडके, दीपक तिघारे, अभिषेक लेंडे, पुनम हटवार व रागिनी बांते यांचा समावेश होता. जिल्हा पर्यवेक्षक संजय जेनेकर यांचे मार्गदर्शन व जिल्ह्यातील सर्व आयसीटीसी समुपदेशक तसेच दृष्टी या समाजवेसी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने एड्स जनजागृती मोहीम यशस्वी करण्यात आली. या मोहिमेसाठी त्या-त्या गावातील आरोग्य सेविका व आशा कार्यकर्त्यांंचेही सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी)