बाराभाटी : आंतरराष्ट्रीय खेळ हे मात्र जगभर नावारूपास आहेत. पण, भारतीय खेळात कबड्डी हा खेळ खूप वर्षांपासून आजही जसाच्या तसा आपली छाप सोडून कायम आहे. म्हणूनच, आजही या स्वदेशी कबड्डी खेळाची कीर्ती अजरामर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय संविधान सेनेचे अध्यक्ष दिलवर रामटेके यांनी केले.
येथील केजाजीबाब क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित खुल्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी (दि.२३) अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन अनिल दहिवले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून लीलाधर ताराम, परसराम माने, मुख्याध्यापक राजू मेश्राम, तुलाराम मारगाये, रवींंद्र वालदे, पोलीसपाटील हेमलता खोब्रागडे, शिक्षक खोब्रागडे उपस्थित होते. भगवान हनुमानाच्या मूर्तीची पूजा करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनीसुद्धा खेळाविषयी मार्गदर्शन केले.