शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

खडकी येथे जनजागरण मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:34 IST

केशोरी : स्थानिक पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सशस्त्र पोलीस दूरक्षेत्र भरनोलीच्या वतीने आदिवासीबहुल ग्राम खडकी येथील आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी जनतेशी ...

केशोरी : स्थानिक पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या सशस्त्र पोलीस दूरक्षेत्र भरनोलीच्या वतीने आदिवासीबहुल ग्राम खडकी येथील आदिवासींच्या समस्या सोडविण्यासाठी जनतेशी हितगुज करून सुसंवाद साधण्यासाठी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करून समाजोपयोगी उपक्रमांतर्गत छत्री वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

-जिल्हा पोलीस अधीक्षक, विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात नक्षलग्रस्त भागातील जनतेशी सुसंवादातून हितगुज करून त्यांच्या समस्या सोडविण्याच्या संकल्पनेतून ग्राम खडकी येथे भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे औचित्य साधून येथील ९० आदिवासी कुटुंबीयांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, ठाणेदार संदीप इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक जोहेब शेख, पोलीस उपनिरीक्षक ठवकर, पोलीस उपनिरीक्षक टाफे, पोलीस उपनिरीक्षक मारग उपस्थित होते. प्रास्ताविकातून पोलीस उपनिरीक्षक ठवकर यांनी जनजागरण मेळाव्याची उद्दिष्टे सांगून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. अशोक बनकर यांनी नक्षलग्रस्त भागातील जास्तीत जास्त युवतींनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन चांगल्या दर्जाचे शिक्षण घ्यावे आणि पोलीस विभागासह इतर आवडीच्या क्षेत्रात नोकरीसाठी पुढे यावे, आदिवासी युवक- युवतींना शासकीय सेवेची संधी उपलब्ध व्हावी, म्हणून पोलीस विभाग आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असून, स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी वाचनालयाच्या माध्यमातून व्यवस्था करून दिल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरीक्षक ठवकर यांनी केले, तर आभार पोलीस उपनिरीक्षक जोहेब शेख यांनी मानले.