शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तळागाळातील महिला, युवकांच्या लेखन कलागुणांना प्रोत्साहन देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:36 IST

गोंदिया : तळागाळातील महिला, युवकांच्या लेखन व कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्रामीण स्तरावर जागोजागी जनजागृती व साहित्यवृद्धीपर ...

गोंदिया : तळागाळातील महिला, युवकांच्या लेखन व कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्रामीण स्तरावर जागोजागी जनजागृती व साहित्यवृद्धीपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेच्या जिल्हा अध्यक्षा प्रा. डॉ. दिशा गेडाम यांनी दिली.

संस्थेअंतर्गत सुप्रभात चारोळी, कविता, सुभाषित, रांगोळी, दिन विशेष काव्य, कथाकथन, स्त्री संघर्षाची गाथा, लोककथा, लेख, रचना व यावरील प्रतिक्रिया हे दैनिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच महिलांना स्वतंत्र व्यासपीठ प्राप्त करून देणे, समग्र महिलांना लिहितं करून एकाच व्यासपीठावर संघटित करणे, लिहा आणि लिहिते व्हा हे तत्त्व, मुख्य उद्दिष्ट, जिथे जिथे मराठी भाषा तिथे तिथे मराठी लेखिका संघटित करणे, महिलांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन व ऑफलाइन कार्यक्रम आयोजित करून विश्व व्यासपीठ महिलांना मिळवून देणे, मराठी साहित्य चळवळ विश्वात्मक करणे, साहित्याबरोबरच विविध क्षेत्रांतील महिलांना मुक्त व्यासपीठ प्राप्त करून देणे ही आम्ही सिद्ध लेखिका या संस्थेचे उद्दिष्टे आहेत. यात महिला, युवकांनी सहभाग घ्यावा, असे संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रा. डॉ. दिशा गेडाम, उपाध्यक्ष डॉ. सुवर्णा हुबेकर, सचिव प्रा. कविता राजाभोज, कार्याध्यक्ष यशोधरा सोनवणे, कोषाध्यक्ष वंदना कटरे, संचालक-सदस्य प्रा. अनिता कोडापे, पुष्पा लिल्हारे, शालू कृपाले यांनी केले आहे.