शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा लाभ देणे ही सर्वांची जबाबदारी

By admin | Updated: July 18, 2016 00:07 IST

ग्रामीण भागातील सर्वसामान्य लाभार्थी हा तालुका पातळीवरील कार्यालयात योजनांचा लाभ घेण्यासाठी येऊ शकत नाही.

गोंदिया : ग्रामीण भागातील सर्वसामान्य लाभार्थी हा तालुका पातळीवरील कार्यालयात योजनांचा लाभ घेण्यासाठी येऊ शकत नाही. तेव्हा गावपातळीवरील गरजू लाभार्थ्यांचा शोध घेवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. शुक्रवारी (दि.१५) सडक-अर्जुनी पंचायत समिती सभागृहात महासमाधान शिबिराच्या पूर्व तयारीचा आढावा घेताना ते बोलत होते. सभेला पंचायत समिती उपसभापती विलास शिवणकर, जिल्हा परिषद सदस्य माधुरी पाथोडे, शिला चव्हाण, पंचायत समिती सदस्य राजेश कठाणे, गिरीधारी हत्तीमारे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, गट विकास अधिकारी लोकरे प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री पुढे म्हणाले, आॅगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महासमाधान शिबीराच्या माध्यमातून जवळपास ४० हजार लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्याचा आपला संकल्प आहे. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधींनी नियोजनातून काम करावे. त्यामुळे गरजू लाभार्थी योजनांपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यातील अपंग व्यक्तीच्या स्वावलंबनासाठी २ कोटी रु पर्यंतची तरतूद केली असून अशा दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी दिव्यांग स्वावलंबन अभियान-२०१६ राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार परळीकर यांनी, महासमाधान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विविध यंत्रणांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी कामचुकारपणा करु नये असे सांगितले. यावेळी गजानन वाघ यांनी समाधान शिबिराच्या नियोजनाची व दिव्यांग स्वावलंबन अभियानाची माहिती दिली. महासमाधान शिबिराच्या पूर्व तयारी आढावा बैठकीला सडक-अर्जुनी तालुक्यातील अनेक गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, कृषी सहायक यांच्यासह यंत्रणांच्या गावपातळीवरील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)