शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त तहसीलदारांच्या बदल्यांचे प्रकरण चिघळणार

By admin | Updated: May 27, 2015 00:57 IST

जिल्ह्यातील पाच तहसीलदारांच्या बदल्यांपैकी चार तहसीलदार आपापल्या ठिकाणी रुजू झाले आहेत.

गोंदिया : जिल्ह्यातील पाच तहसीलदारांच्या बदल्यांपैकी चार तहसीलदार आपापल्या ठिकाणी रुजू झाले आहेत. मात्र देवरीचे तहसीलदार संजय टिळक यांना पुन्हा तिरोड्यात देण्याचे प्रकरण सध्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाले असून त्यामुळे अद्याप त्यांना देवरीतून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.जिल्ह्यातील चार तहसीलदारांच्या जिल्ह्यांतर्गत तर एका तहसीलदाराची बदली जिल्ह्याबाहेर करण्यात आली. यात पूर्वी तिरोडा येथेच असणारे संजय नागटिळक यांना त्यांच्याविरूद्ध वाढलेल्या तक्रारीनंतर देवरीत पाठविण्यात आले होते. मात्र आता पुन्हा त्यांची बदली तिरोड्यात केल्याने हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. याप्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हा विषय आपल्यासाठी अनाकलनिय असून वरिष्ठ स्तरावरूनच हा बदलीचा आदेश आल्याचे सांगण्यात आले. नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात याबाबत चौकशी केली असता मंत्रालय स्तरावर हालचाली झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासकीय स्तरावर या बदल्यांबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. देवरीचे तहसीलदार संजय नागटिळक यांना अद्याप कार्यमुक्त केले नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. याप्रकरणी नागटिळक यांनी ‘लोकमत’शी बोलताना आपण तिरोड्यात रूजू होण्यास आग्रही आहे ही बाब चुकीची असल्याचे सांगून दुसरे कोणी तिथे जाण्यास इच्छुक असेल तर आपल्याला हरकत नाही, असे स्पष्ट केले.(जिल्हा प्रतिनिधी)