शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक व्यवहाराची चौकशी करा

By admin | Updated: July 7, 2016 01:55 IST

तालुक्यातील पिंपळगाव (खांबी) ग्रामपंचायतच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या एलईडी बल्ब व शौचालय बांधकामात करण्यात आलेल्या ...

ग्रामपंचायत पिंपळगाव : चौकशी अहवालावरून कारवाई करा बोंडगावदेवी : तालुक्यातील पिंपळगाव (खांबी) ग्रामपंचायतच्या वतीने खरेदी करण्यात आलेल्या एलईडी बल्ब व शौचालय बांधकामात करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तक्रारीवरून सहायक खंडविकास अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालावरून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रफुल खोब्रागडेसह गावकऱ्यांनी केली आहे. अर्जुनी-मोरगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव (खांबी) ग्रामपंचायतच्या गैरकारभाराची तक्रार ग्रामस्थांनी केली. गावामध्ये लावण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या एलईडी बल्बमध्ये तसेच गावात बांधलेल्या शौचालय बांधकामामध्ये आर्थिक घोळ असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला होता. तक्रारीच्या अनुषंगाने सहायक गट विकास अधिकाऱ्यांनी २७ मे २०१६ रोजी प्रत्यक्ष ग्रामपंचायत कार्यालयात जावून चौकशी केली. तक्रारकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्याच्या अनुषंगाने चौकशी अहवाल सादर केला. ग्रामपंचायत कारभाराच्या चौकशी अहवालात काही प्रमाणात ताशेरे ओढून संशयास्पद व्यवहार केल्याचे आढळून येत असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायतच्या १३ व्या वित्त आयोग निधी मधून ३० नग एलईडी बल्ब खरेदी करण्यासाठी पुरवठादारांकडून निविदा मागविण्यात आल्या. ३ हजार ३५० रुपये, १ हजार ४५० रुपयाप्रमाणे प्रतिनग पथदिव्याची किंमत असताना ९ हजार रुपये जास्त किंमतीचे दरपत्रके उपलब्ध झाल्याचे ठरावात नमूद असल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. तसेच खरेदी प्रक्रियेतून २२ पथदिवे खरेदी केले आहेत. ८ पथदिवे खरेदी केले नसून भ्रष्टाचार केल्याचा त्यात उल्लेख केला आहे. शौचालय बांधकाम न करताच जुने शौचालय दाखवून निधीचा गैरवापर केल्याचे आढळून आल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. विलास हेमराज गजबे व त्यांचे वडील हेमराज गजबे या दोघांनाही वेगवेगळ्या वेळी शौचालय निधी प्राप्त होऊनही दोघांनीही शौचालये बांधले नाही, असे स्पष्ट नमूद केल्याचे त्या अहवालात दिसून येत आहे. पथदिव्याच्या खरेदीसाठी ग्रामसेवकाने कोणत्याही प्रकारची जाहीर नोटीस वर्तमानपत्र दिले नाही. गावामध्ये किंवा ग्रामपंचायत कार्यालयातही लावले नाही. कोणताही प्रचारप्रसिध्दी जाहीर न करताच गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या दूरवरच्या ठिकाणावरून दरपत्रके प्राप्त होणे, हे संशयास्पद आहे. संबंधित ग्रामसेवकानेच पुरवठादारांशी संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार केला. पुरवठा आदेश दिलेल्या माही ट्रेडर्सने एकूण किती नग पथदिवे कोणत्या कंपनीचे ग्रामपंचायतला पुरविले याची नोंद साठा रजिस्टरला नाही. प्राप्त दरपत्रके, मूळ बिल व पुरवठा केल्याची पोचपावती ग्रामपंचायत कार्यालयाकडे चौकशी अधिकाऱ्यांनी मागणी केली असता सादर करण्यात आली नाही. या व्यवहाराची प्रशासकीयदृष्ट्या कोठेही अपेक्षित आवश्यक नोंद घेण्यात आली नाही. पुरवठादाराला अशा केलेल्या रकमेचे प्रमाणके व धनादेश यांच्यात पूर्णपणे विसंगती असून दिशाभूल केली आहे. साठा नोंद रजिस्टरला यापूर्वी पर्यावरण समृध्दी योजनेमधून पाच व समाज कल्याण योजनेतून १० पथदिव्यांची नोंद केलेली नाही, असे चौकशी अहवालात चौकशी अधिकाऱ्यानी म्हटले आहे. २४ आॅगस्ट २०१५ च्या पुरवठादारांच्या प्रतिनग दराच्या किंमतीमध्ये खाडाखोड केलेली दिसल्याचे नमूद आहे. एकंदरीत एलईडी बल्ब खरेदी व शौचालय अनुदान वाटपात गैरप्रकार होऊन आर्थिक गैरव्यहार झाल्याचे चौकशी अहवालात म्हटले आहे. त्यामुळे सरपंच, सचिव यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. (वार्ताहर)