शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

आंतरधर्मीय प्रेमीयुगुल विवाह बंधनात

By admin | Updated: July 6, 2017 02:08 IST

प्रेमाची व्याप्ती मोठी आहे. समाजात वावरणारा प्रत्येक जन कोणावर तरी प्रेम करतो. प्रेमानेच सारे जग सर करता येवू शकते,

मिलिंद बुद्ध विहार संस्थेचा उपक्रम : समाज परिवर्तनाची नांदी लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : प्रेमाची व्याप्ती मोठी आहे. समाजात वावरणारा प्रत्येक जन कोणावर तरी प्रेम करतो. प्रेमानेच सारे जग सर करता येवू शकते, असे म्हणतात. प्रत्येकाच्या प्रेम करण्याच्या पध्दती मात्र वेगवेगळ्या असू शकतात. अंतर्मनातून निस्सीम प्रेम करणाऱ्यांमध्ये कदापिही गरिबी-श्रीमंती, जात, पंथ, धर्म आड येत नाही. ऐन तारुण्याच्या वयात एकमेकांच्या प्रेमात पडणाऱ्या आंतरधर्मीय प्रेमीयुगुलांना विवाह बंधनात बांधून पती-पत्नीच्या पवित्र नात्यात अडकविण्याचे काम येथील मिलिंद बुध्द विहार संस्थेने केले. जाती-पातीला मुठमाती देऊन बौध्द व हिंदू धर्मीय प्रेमवीर अखेर लग्नाच्या जोखडात बांधल्या गेले. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील महागाव (सिरोली) येथील २३ वर्षाचा युवक राकेश भाईचंद मेश्राम हा कामानिमित्त गाव सोडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन-तीन वर्षापूर्वी गेला होता. एका खासगी कंपनीमध्ये काम करीत असताना देवगड तालुक्यातील सौंदाळे येथील प्राजक्ता मोडे या युवतीशी त्याची पहिल्या प्रथम ओळख झाली. एकाच ठिकाणी कामाला असल्याने दोघांच्याही भेटीगाठी व्हायच्या. वारंवार भेटीच्या प्रसंगांनी घट्ट मैत्रीचे रुप धारण केले. पाहता पाहता ते दोघेही एकमेकांच्या प्रेमपाशात अडकले. मागील दोन वर्षांच्या सहवासाने त्यांचे प्रेम बहरले. प्रेमात आपला धर्म आड येणार नाही, अशी प्रतिज्ञा करुन भविष्यात पती-पत्नी म्हणून आपला नवा संसार थाटू, असे ते प्रेमीयुगुल स्वप्न रंगवित होते. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या युवक-युवतींच्या घरची परिस्थिती बेताची असतानासुध्दा प्रेमात विजय मिळविण्यात ते यशस्वी झाले. दोघे ही सज्ञान असल्याने पुढील आयुष्य आपण पती-पत्नी म्हणून नांदू, अशी खुणगाठ मनोमन बांधून दोघेही प्रेमीयुगुलांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महागाव-सिरोली येथील प्रेमविराचे घर गाठले. बोंडगावदेवी येथील एका नातलगाच्या मदतीने त्यांनी मिलिंद बुध्द विहार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना भेटून लग्न लावून देण्याची विनंती केली. दोघांच्याही जन्म तारखेवरुन विवाहयोग्य वय असल्याची खात्री झाल्याने आनंद बुध्द विहारामध्ये आंतरधर्मीय विवाह समारंभ आयोजित करण्यात आला. संस्थेचे पदाधिकारी मयाराम रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली भिवाजी शहारे, अशोक रामटेके, पुंडलिक भैसारे, जितेंद्र मेश्राम, सुखदास रामटेके यांच्या उपस्थितीत सोहळा पार पाडण्यात आला. मुलगा बौध्द धर्माचा असल्याने वैवाहिक कार्यक्रम बौध्द धम्माच्या संस्कार पध्दतीने पार पाडून, त्या आंतरधर्मीय प्रेमीयुगुलांना विवाह बंधनात अडकवून पती-पत्नीच्या पवित्र नात्यात बांधण्यात आले. धार्मिक विधी अमरचंद ठवरे यांनी पार पाडली. मिलिंद बुध्द विहार संस्थेच्या वतीने नवदाम्पत्यांना संसार उपयोगी साहित्य भेट स्वरुपात देण्यात आले. लग्न समारंभाला मुलाचे नातलग तसेच गावातील बहुसंख्येने नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. शासन स्तरावरुन आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले जात असल्याने संस्थेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. ही एक समाजपरिवर्तनाची नांदी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी त्या प्रेमीयुगुलांना आशीर्वाद देऊन अनेकांनी आर्थिक भेट दिली.