शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय धान खरेदीत व्यापाऱ्यांचेच हित

By admin | Updated: November 29, 2015 02:38 IST

शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शासनाने ठिकाठिकाणी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले असले तरी प्रत्यक्षात मार्केटिंग फेडरेशन

सातबाऱ्यात गडबड : एकच केंद्र दोन्हीकडेगोंदिया : शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शासनाने ठिकाठिकाणी शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले असले तरी प्रत्यक्षात मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या यादीत काही गावे सारखीच दाखविली आहेत. त्यामुळे सातबाऱ्यात गडबड करून प्रत्यक्षात शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचा माल खरेदी केंद्रावर आणला जात असल्याचा आरोप जि.प.चे माजी सभापती अशोक लंजे आणि रोषण बडोले यांनी केला आहे.यावर्षी शासकीय धान खरेदी केंद्र आधीच उशिरा सुरू झाले. त्यातच एकाच गावात दोन्ही एजन्सींकडून धान खरेदी केंद्र कसे काय देण्यात आले असा प्रश्न निर्माण झाला आहे. वास्तविक आदिवासी आणि बिगर आदिवासी क्षेत्रात कुठे-कुठे धान खरेदी केंद्र देणार याची यादी जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि आदिवासी विकास महामंडळाने प्रकाशित करून त्याची माहिती शेतकऱ्यांना देणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही करण्यात आले नाही. त्यामुळे यामागे मोठे गौडबंगाल असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मार्केटिंग फेडरेशनकडून सौंदड केंद्रांतर्गत घाटबोरी-कोहळी, बाम्हणी केंद्रांतर्गत बाम्हणी, मसवानी, बोथली, मुरपार केंद्रांतर्गत पांढरवानी-रजत, घोटी, दोडके, जांभळी, घाटबोरी-तेली तसेच पांढरी केंद्रांतर्गत खडीपार ही गावे जोडली आहेत. हीच गावे आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रालाही जोडण्यात आली आहेत. व्यापाऱ्यांचा धान खरेदी केंद्रावर येऊ नये यासाठी शेतकऱ्यांचे सातबारा देताना खसऱ्यामध्ये धानाची जात नमूद करावी, तसेच धान्य विक्रीसाठी सातबारा असा स्टॅम्प मारून पटवाऱ्याने तशी नोंद घ्यावी, केंद्रावर खरेदी केलेल्या धानाच्या नोंदी तलाठी, मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार आदींनी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठवावा, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व टीडीसी कडील आकडे तपासून घ्यावेत, शेतकऱ्यांचे धान टोकन पद्धतीने घेण्यात यावे, त्यामुळे व्यापाऱ्यांचे डी.ओ. केंद्रावर अ‍ॅडजेस्ट होणार नाही. धान भरडाईसाठी देताना बारदान्यासकट द्यावे. त्यामुळे बारदाना बदल होणार नाही, अशी मागणी लंजे यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)