शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

जिल्ह्यातील पाण्याच्या नमुन्यांची तपासणी भंडाऱ्यात

By admin | Updated: August 19, 2016 01:26 IST

पिण्याचे शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक महिन्यात पाण्याच्या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते.

समस्या आरोग्याची : रासायनिक तपासणी अधिकाऱ्याचे पद रिक्त गोंदिया : पिण्याचे शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक महिन्यात पाण्याच्या नमुन्यांची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. ही तपासणी जैविक व रासानिक अशा दोन प्रकारे केली जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात रासायनिक तपासणी करणारे अधिकारीच नाहीत. त्यामुळे येथील पाण्याच्या नमून्यांच्या रासायनिक तपासणी करण्यासाठी नमूने भंडारा येथे पाठविण्याची पाळी येते. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. स्वच्छता व पाण्याच्या गुणवत्तेसाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करतो. मात्र संबंधित अधिकारी शासनाच्या प्रयत्नांवरच पाणी घातल आहेत. पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा तयार केली जाते. त्यात रासायनिक व जैविक अशा दोन भागात तपासणी केली जाते. जिल्ह्यातील प्रयोगशाळेत दर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाण्याचे नमूणे तपासणीसाठी आणले जातात. परंतु रासायनिक प्रक्रियेने पाण्याची तपासणी प्रयोगशाळेत होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाण्याचे नमूणे रासायनिक तपासणीसाठी भंडारा येथील प्रयोगशाळेत पाठविले जातात. जिल्ह्यातील प्रयोगशाळेत केवळ जैविक तपासणी केली जाते. शासनाने रासायनिक तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेत वरिष्ठ रासायनिक सहायक हे पद मंजूर केले आहे. हे पद मागील महिन्यापासून रिक्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात रासायनिक तपासणी केली जात नसून पाण्याच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (प्रतिनिधी) रासायनिक तपासणी जलस्त्रोतांची तपासणी रासायनिक व जैविक प्रक्रियेने केली जाते. रासायनिक तपासणीत पीएच, कंडक्टीव्हिटी, क्षार, कॅलशियम, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड, फ्लोराईड, सल्फेट, नायट्रेट, लोह, जस्त, तांबे, पारा, आर्सेनिक, सेलेनियम, कॅडमियम, कीटनाशक व जंतुनाशक पाण्यातील स्त्रोतात तपासले जातात. सर्व जलस्त्रोतांचे नमूने ‘फिल्ड टेस्ट कीट’च्या माध्यमाने प्रयोगशाळेत आणले जातात. त्यांची तपासणी करून अहवाल ग्रामपंचायत व आरोग्य विभागाला पाठविला जातो. पाण्यात रसायनांची मात्रा अधिक असली तर पाण्याचा उपयोग पिण्यासाठी न करण्याचा सल्ला दिला जातो. जैविक तपासणी जिल्ह्यातील प्रयोगशाळेत जैविक तपासणी होते. पाण्यात सूक्ष्म जीवांचे प्रमाण तपासण्यासाठी कोलीफॉर्म व फिकल कोलीफॉर्मचे प्रमाण तपासले जाते. पाण्याच्या नमून्यात एच टू एस वायलवर २४ ते ४८ तासांपर्यत ठेवले जाते. दरम्यान पाण्याच्या नमून्यांचा रंग काळा झाल्यास पाण्यात विषाणू असल्याचे स्पष्ट होते. जैविक तपासणीसाठी अनुजीव विभागाचे दोन पद मंजूर आहेत. त्यातील एक पद रिक्त आहे. कनिष्ठ वैज्ञानिकाचेही एक पद रिक्त आहे.