शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवर अन्याय

By admin | Updated: August 26, 2015 01:50 IST

सावकारी पाशातून शेतकऱ्याची सुटका करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असले तरी प्रत्येक्षात अनेक शेतकऱ्यावर अन्याय झालेला दिसत आहे.

करडी (पालोरा) : सावकारी पाशातून शेतकऱ्याची सुटका करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असले तरी प्रत्येक्षात अनेक शेतकऱ्यावर अन्याय झालेला दिसत आहे. आजही शेतकरी कर्जात अडकलेले आहेत.राज्य शासनाने ज्या शेतकऱ्यांनी आपले कडील सोने तारण म्हणून सावकाराकडे गहाण ठेवून कर्ज घेतले असेल अशा शेतकऱ्याचे सावकारी कर्ज माफ करण्याचे निर्णय घेतले आहे. परंतू आजही अनेक शेतकऱ्यांनी परिसरातील जवळच्या सहकारी बँकाकडून आपल्याकडील सोने तारण ठेवून शेतीकरिता कर्ज घेतले अशा शेतकऱ्यावर अन्याय झालेला दिसत आहे. जगाचा पोशींदा असलेल्या बळीराजा केवळ सावकाराकडून कर्ज घेवून आत्महत्या करतो, ही बाब संवेदनशील मनाला हेलावून सोडणारी आहे. बळीराजाची सावकारी पाशातून सुटका करण्यसााठी राज्य शासनाने ठोस पावले उचलले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेतले असले तरी तेवढ्याच प्रमाणात इतर बँकाकडून सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे हे शासनाच्या व प्रतिनिधींच्या लक्षात येत नाही काय, सावकाराकडे सोने तारण ठेवून सावकाराकडून कर्ज घेतले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आदेशही निघाले. परंतु ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडे सोने तारण ठेवून कर्ज उचल केले आहे. अशा शेतकऱ्यांची अधीकृत नोंद त्या बँकेकडून घेतली नाही व शासनापर्यंत पोहचती केली नाही या धोकामुळे शेतकऱ्यांचा बळी जावू शकतो. शासनाने अनेक शेतकऱ्यावर अन्याय करून दिशाभूल केले जात आहे. आजघडीला सहकारी बँकेतून अनेक शेतकऱ्यांनी सोने तारण ठेवून शेतीकरिता कर्ज घेतलेला आहे. अशा शेतकऱ्याकडे लोकप्रतिनिधीचे लक्ष दिसत नाही. राज्यात अनेक बँकाकडून शेतकरी ७/१२ घेवून सोने तारण करून कर्ज घेत आहेत. अशा बँकेकडून शेतकऱ्याची माहिती घेवून सावकारी कर्जबरोबर बँकेकडून सोने तारण कर्जाची कर्जमाफी करण्यात यावी ही काळाची गरज आहे. तेव्हाच खरा बळीराजा सावकारी कर्जापासून मुक्त होईल, अशी मागणी पालोरा पंचायत समिती सदस्य महादेव बुरडे, किरण भोयर आदिंनी केली आहे.(वार्ताहर)