शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकावर खोडकिडी अन् करपा रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 3, 2014 23:30 IST

धानपीक उत्पन्नायोग्य होईपर्यंत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. यात पिकांवर येणारी रोगराई प्रमुख आहे. धानपिकाला पाण्याची गरज असताना खोडकिडी आणि करपा

काचेवानी : धानपीक उत्पन्नायोग्य होईपर्यंत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. यात पिकांवर येणारी रोगराई प्रमुख आहे. धानपिकाला पाण्याची गरज असताना खोडकिडी आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.सद्यस्थितीत कृषी विभागाचा सल्ला घेण्याकरिता आणि कृषी विभागात आलेल्या योजनांची माहिती घेण्याकरिता कृषी विभागाच्या कार्यालयात दिवसभर शेकडो शेतकरी हजेरी लावत असल्याचे दिसून येते. तिरोडा तालुक्यात सर्वत्र खोडकिडी आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी मिळत असल्याचे तिरोडा कृषी विभागाचे पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी सांगितले.सद्यस्थितीत शासनाकडून कृषी विभागाकडे कोणत्याही प्रकारच्या कीडनाशक आणि रोगनाशक औषधी पुरविण्यात आल्या नाहीत. औषधीची मागणी करण्यात आली आहे. त्या उपलब्ध होताच शेतकऱ्यांपर्यंत पुरविल्या जातील, असेही पर्यवेक्षक पारधी यांनी लोकमतला सांगितले आहे.खोडकिडी ही धान पिकांसाठी विनाशकारी असून नियंत्रणाकरिता फ्लोरोपायरीकॉस किंवा क्विनापफॉस २५ मिली १० लिटर पाण्यात फवारणी करावी. या व्यतिरिक्त कारटॉप हायड्रोक्लोराईड पाच किलो किंवा परटेला पाच किलो प्रति एकर वापरावे. तसेच कडाकरपा आणि करपा रोगाकरिता कॉब्रेन्डेझिम कॉपर आॅक्झीक्लोराईड यात स्टेटरोसायक्लीन २५ ग्रॅम मिसळून फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी औषधांची गरज पडते. कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या औषधी स्वस्त दरात मिळत असल्याने सर्वसाधारण शेतकऱ्यांकरिता त्या महत्वाच्या असतात. मात्र कृषी विभागाकडून मिळणाऱ्या औषधी कधीही वेळेवर देण्यात येत नसल्याचे आरोप शेतकऱ्यांनी केले आहेत.तालुका कृषी विभागाने पीक लावणीच्या वेळी किंवा मे व जून महिन्यात संभावित कीड व रोगनाशक औषधीची मागणी केली असती तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हाती औषधी लागली असती. मात्र कृषी विभाग निष्काळजीपणा करुन उशीरा मागणी करीत असल्याने वेळेवर शेतकऱ्यांना औषधी पुरविली जात नाही.खासगी औषधी विक्रेते आणि कृषी विभागाचे साटेलोटे असल्याने कृषी विभाग औषधांची मागणी उशीरा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना महागडी औषधी बाजारातून विकत घेण्याची पाळी आली आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांना दरिद्र बनवून व्यापारांचे हित जोपासत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांकरिता स्वस्त दरात औषधी उपलब्ध करुन देण्याची शेतकऱ्यांनी कृषी विभागाला मागणी केली आहे. (वार्ताहर)