शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

त्या रोजगार सेवकावर कारवाईचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:19 IST

राजकुमार भगत सडक अर्जुनी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मौजा परसोडी येथील नाला सरळीकरण व ...

राजकुमार भगत

सडक अर्जुनी : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मौजा परसोडी येथील नाला सरळीकरण व साठवण बंधारा दुरुस्ती काम करण्यात आले होते. या कामात रोजगार सेवक सुधीर लेदे यांनी भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार ग्रा.पं. परसोडी आणि नागरिकांनी तहसीलदार सडक अर्जुनी व खंडविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावरून त्या रोजगार सेवकावर कारवाईचे संकेत दिले आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत मौजा परसोडी येथील नाला सरळीकरण व साठवण बंधारा दुरुस्ती कामावरील काही मजूर हे प्रत्यक्ष कामावर नसतानासुद्धा त्यांची नावे ग्राम रोजगार सेवकांनी मंजुरी काढल्याचे ग्रा.पं. व गावकऱ्यांच्या लक्षात आले होते. ल.पा. जि.प. उपविभाग आमगाव या योजनेचे सन २०२०-२१ मधील नाला सरळीकरणाचे काम ३ मार्च २०२१ ला सुरू करण्यात आले होते. ते ७ मार्च २०२१ पर्यंत होते. या कामावर अकुशल खर्च १२ लाख ६८ हजार ९४५ रुपये दाखविण्यात आला. त्यामध्ये ७० हजार ४५५ रुपये बोगस मजूर दाखवून भ्रष्टाचार करण्यात आल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनात आले. जे मजूर कधी कामावरच नव्हते, त्यातील काही गावामध्येच नव्हते, अशांचाही समावेश करण्यात आला होता. ग्रामपंचायतने बोगस मजुरांची यादी प्रत्यक्ष जोडून रोजगार सेवक सुधीर लेदे व ल.पा.जि.प. उपविभाग आमगावचे कनिष्ठ अभियंता शैलेंद्रकुमार मेश्राम यांच्या विरोधात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने तहसील कार्यालयाने चौकशी समिती गठित करुन तक्रारीच्या अनुषंगाने दि. ८ व ९ एप्रिल रोजी ग्रा.पं. कार्यालय परसोडी येथे मजूर, सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक व कनिष्ठ अभियंता यांचे बयान नोंदवून त्यांचा अहवाल सादर करण्यात आला. त्या अहवालावरून ग्रामरोजगार सेवकावर कारवाईचे संकेत दिसत आहे.

कोट....

तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून अहवाल खंडविकास अधिकारी पं.स. सडक अर्जुनी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

- उषा चौधरी, तहसीलदार, सडक अर्जुनी

कोट.....

तहसील कार्यालयाकडून चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. कारवाई करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्याकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला आहे.

-डी. एस. खुणे, खंडविकास अधिकारी, पं.स. सडक अर्जुनी