शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या धुरामुळे श्वसनाच्या आजारात वाढ

By admin | Updated: November 10, 2016 00:40 IST

वाहनांच्या इंधन टाक्यामध्ये होणाऱ्या रॉकेलच्या वापराने सर्व सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

रॉकेलचा सर्रास वापर : संबधित विभागाचे कारवाईकडे दुर्लक्षरावणवाडी : वाहनांच्या इंधन टाक्यामध्ये होणाऱ्या रॉकेलच्या वापराने सर्व सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाहनाच्या गडद धुरामुळे नागरिकांना विविध श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रॉकेलचा इंधन म्हणून ट्रॅक्टर, आॅटोत वापर होत असल्यामुळे या वाहनामधून मोठा धूर निघत असतो. त्या धुरामुळे आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत आहे. वाहनात इंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या डिझेलचे भाव वाढत असल्याने आणि ते परवडण्यासारखे नसल्यामुळे ट्रॅक्टर मालक गावोगावी फिरून रॉकेल उच्च दरात खरेदी करून वाहनामध्ये इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर रॉकेलच्या वापर करतात. अशा वाहनावर कुठे कारवाई झाली असल्याची ऐकीवात नाही. ग्रामीण भागात ट्रॅक्टरची संख्या मोठ्याने वाढली आहे. रॉकेल वापरण्याचा प्रकारात ट्रॅक्टर मालक आघाडीवर आहेत. गरजू नागरिकांना विक्रेत्याकडून रॉकेल मिळत नाही. ट्रॅक्टर मालकाना उच्च किंमतीत मुबलक प्रमाणात रॉकेल उपलब्ध होत आहे. याच रॉकेलचा इंधन म्हणून वापर होत असल्यामुळे वाहनातून मोठ्याने धूर निघत आहे. या धुरामुळे सर्व सामान्य नागरिकांना श्वसनाचा आजार जडत आहे. सध्या स्थितीत डिझेलच्या किंमती वाढल्यामुळे वाहन धारक रॉकेल खरेदीकडे वळला आहे कमी पैशात जास्तीचा नफा कमविण्याच्या बेतात सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. रॉकेल विक्रेत्याची कुणाकडूनही तक्रार होत नसल्यामुळे हा प्रकार दिवसेंदिवस वाढतच् चालला आहे. दुप्पट दराने रॉकेल विक्री करून विक्रेते आपली आर्थिक स्थिती बळकट करीत आहेत. मात्र गरजू नागरिकांना रॉकेल मिळणे मोठे अवघड झाले आहे. मात्र वाहन धारकांना उच्च दरात मुबलक रॉकेल उपलब्ध होत असल्यामुळे ग्रामीण भागातील वाहन अति जास्त गडद धूर ओकत आहेत. या प्रकाराकडे संबंधीत विभागाने लक्ष देऊन वाहनाच्या टाक्या तपासणी मोहीम हाती घेण्याचा गरज सध्या निर्माण झाली आहे. परंतु परिवहन विभाग किंवा पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)