गोंदिया : ग्रामीण भागात फारशी कारखानदारी नसली तरी दिवसेंदिवस होत असलेला रसायनाचा उपयोग, मोठयÞा प्रमाणात होणारी वृक्ष कटाई, वाहनांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहे.यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ग्रामीण भागातील ग्रामपंचायत व आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचारी यांच्या निष्काळजीपणामुळे ग्रामीण भागात अस्वच्छता राहते.हे प्रदूषणात मोठयÞा प्रमाणात वाढ होण्यामागील मुख्य कारण आहे.गावातील नाल्यांमध्ये साचलेला केरकचरा, सांडपाणी, पिण्याचे पाणी, दूषित पाणी यामुळेही प्रदूषणात वाढ होऊन याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन नवनवीन आजाराची निर्मिती होत आहे.यामुळे शासन, प्रशासनाच्या प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंध विभागाने प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर शोधमोहीम सुरूकरावी. तसेच प्रदूषणास कारणीभूत व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावातील नाली व हँडपंपच्या भोवताल सांडपाणी जमा होते त्या हँडपंपचा पाणी उपयोगात आणल्यास हागवण, पोटाचे विकार उद्भवतात. सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे हवेत प्रदूषण होऊन श्वसनाचे विकार वाढतात.विविध कार्यक्रमांमध्ये स्पीकर, डी.जे., साऊंड सिस्टम अशा ध्वनिक्षेपकाचा आवाज वाजवीपेक्षा जास्त असल्यामुळे व अशा आवाजाच्या सतत सानिध्यात राहिल्याने त्याचा परिणाम थेट हृदयावर होत आहे.त्याप्रमाणे कानावरही परिणाम होऊन कायमस्वरु पी बिहरेपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने अशा प्रदूषणाबाबत सर्वत्र जनजागृती मोहिमेचे आयोजन करणे आवश्यक आहे. वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या सर्वाधिक समस्या उद्भवत आहेत.वायू प्रदूषण म्हणजे हवेमध्ये घातक, दूषित पदार्थाचे मिश्रम होत आहे.डीझेल, पेट्रोल, इतर इंधन, सिगारेट या माध्यमातून कार्बन मोनोक्सिड (रंगहीन वायू) बाहेर पडतो त्यामुळे या वायुमुळे प्रदूषण जास्त होताना दिसते. या अपायकारक वायूचे प्रमाण वातावरणात वाढल्यामुळे प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे.त्यामुळे शरीराची हालचाल मंदावते. नागरिकांना अनेक शारीरिक समस्या जाणवत आहे. (तालुका प्रतिनिधी)
वायू प्रदूषणामुळे श्वसनाच्या आजारांत वाढ
By admin | Updated: February 19, 2015 01:09 IST