शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात इंटरनेटची साक्षरता वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 01:09 IST

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर कसा करावा याबाबत प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे.

विजय सूर्यवंशी : इंटरनेट साथी प्रशिक्षणात मार्गदर्शनगोंदिया : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर कसा करावा याबाबत प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. आता गुगल सर्च केले की, हवामानाचा अंदाज, जन्माचा दाखला, शेतीविषयक सात-बारा उतारा आदींची माहिती एका क्लिकवर इंटरनेटद्वारे उपलब्ध होते. त्यामुळे जास्तीत जास्त इंटरनेट साथी बघिनींनी इंटरनेटचे प्रशिक्षण घेऊन जिल्ह्यातील इंटरनेटची साक्षरता वाढवावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.येथे टाटा ट्रस्ट, गुगल इंडिया व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डिजीटल साक्षरता कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी (दि.१७) ‘इंटरनेट साथी प्रशिक्षण’ घेण्यात आले. यावेळी माविम मुंबईचे उपव्यवस्थापक महेश कोकरे, दिल्ली येथील टाटा ट्रस्टचे इंटरनेट प्रशिक्षक नवीनकुमार उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, सध्या जिल्ह्यातील ४२२ गावांमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ काम करीत आहे. महिलांनी इंटरनेट साथी उपक्र मांतर्गत इंटरनेटचे प्रशिक्षण घेऊन आपण आपल्या गावामध्ये इंटरनेटच्या वापराबाबत योग्य ती माहिती देऊन जनजागृती करावी. त्यामुळे जिल्ह्यातील इंटरनेटची साक्षरता वाढण्यास निश्चितच मदत होणार असेही त्यांनी सांगितले. कोकरे म्हणाले, आजकाल नोकरीसाठी वा कोणत्याही क्षेत्रात आॅनलाईन अर्ज भरण्याची पध्दत आहे. त्यामुळे महिलांनी सक्षम होण्यासाठी इंटरनेटचा वापर केला पाहिजे. जगाबरोबर वावरायचे असेल तर इंटरनेटचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. नवीनकुमार यांनी इंटरनेटच्या वापराबाबत सविस्तर माहिती विषद केली. प्रास्ताविकेत माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे म्हणाले, टाटा ट्रस्ट, गुगल इंडिया व माहिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने इंटरनेट साथी या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे ग्रामीण क्षेत्रात महिलांसाठी इंटरनेट संदर्भात जाणीव जागृती निर्माण करणे तसेच डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षेच्या योजना, मार्केट दर, शेतीविषयक पध्दती आदी बाबतची माहिती होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात ३६ इंटरनेट साथीच्या माध्यमातून १६५ गावांमध्ये बचत गटातील महिलांना माहिती देण्याचा उपक्र म सुरु करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या हस्ते उपस्थित इंटरनेट साथी भगिनींना अ‍ॅन्ड्राईड मोबाईल आणि टॅब वितरित करण्यात आले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन इंटरनेट साथी प्रशिक्षण कार्यक्र माचे उदघाटन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. कार्यक्र मास महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व इंटरनेट साथी भगीणी बहुसंख्येने उपस्थित होत्या. संचालन योगिता राऊत यांनी तर आभार सतीश मार्कंड यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)