शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनी-मोरगाव ते कोहमारा बस सुरू करून फेऱ्या वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:14 IST

बाराभाटी : कोरोनामुळे बंद पडलेली राज्य परिवहन महामंडळाची बससेवा आता हळूहळ‌ू सावरताना दिसत आहे. अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील सामान्य नागरिकांना ...

बाराभाटी : कोरोनामुळे बंद पडलेली राज्य परिवहन महामंडळाची बससेवा आता हळूहळ‌ू सावरताना दिसत आहे. अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील सामान्य नागरिकांना प्रवास करायला फक्त बस सुविधा आहे. मात्र, या मार्गावर काही निवडकच बस धावतात. त्यामुळे प्रवास सुरळीत व वेळेच्या आत होत नाही. करिता अर्जुनी- मोरगाव ते कोहमारा बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

या मार्गावर अर्जुनी- मोरगाव ते गोंदिया तसेच ब्रह्मपुरी ते गोंदिया या २ बस धावतात व त्यामध्ये अत्याधिक गर्दी असते. त्यात बस वेळेवर कधीच येत नाही. त्यामुळे अर्जुनी- मोरगाव ते कोहमारा या मार्गावरील प्रवाशांना अर्जुनी- मोरगाव ते कोहमारा- गोंदिया असा प्रवास करायला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. कोहमारा ते अर्जुनी- मोरगाव या मार्गावरील नागरिकांना बसमध्ये घेतच नाहीत, अशा वेळी या प्रवाशांनी काय करावे? असा सवाल केल जात आहे. रेल्वे बंद असल्याने अनेक नागरिक व विद्यार्थ्यांची चांगलीच अडचण होत आहे.

-------------------------

बसच्या ४ फेऱ्या करा

या मार्गावर बसच्या दररोज ४-५ फेऱ्या असायला हव्या. प्रत्येक बसस्थानकावर बस थांबविली पाहिजे. ठरलेल्या वेळेवर यायला पाहिजे. ब्रह्मपुरी-गोंदिया बस प्रत्येक स्थानकावर थांबत नाही. या मार्गावर लहान-सहान प्रवासी निवारे आहेत. खेड्यापाड्यांचा भाग आहे. त्यात रेल्वे बंद आहे. म्हणून बसकडे अनेक नागरिकांची धाव आहे. मात्र, या मार्गावर बस नसल्याने बसच्या ४ फेऱ्या करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

------------------------------

मी आपल्या गावावरून नवेगाव बांध येथे कनिष्ठ महाविद्यालयात शिकायला जातो. या मार्गावर धावणाऱ्या बस थांबवायला पाहिजेत; परंतु थांब॔वत नाहीत. म्हणून अर्जुनी- मोरगाव ते कोहमारा बस पाहिजे.

- सुहास सुरेश बोरकर,

विद्यार्थी, येरंडी.