शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिबट शिकाऱ्यांच्या वनकोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:27 IST

गोंदिया : तिल्ली-मोहगाव येथील शेताजवळ करंट लावून दोन बिबट्यांची शिकार करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना ...

गोंदिया : तिल्ली-मोहगाव येथील शेताजवळ करंट लावून दोन बिबट्यांची शिकार करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना २० जानेवारीपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली होती. त्या आरोपींना आज (दि.२०) रोजी गोंदियाच्या जिल्हासत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्या आरोपींना पुन्हा पाच दिवसांच्या वनकोठडीत वाढ केली आहे.

इंदिरानगर तिल्ली येथील देवानंद सोनवाने यांच्या शेतातील विहिरीत ३ जानेवारीला एक बिबट विहिरीत आढळला. या बिबट वन्यप्राण्याचा मृत्यूचा कारणांचा शोध घेत असता, ४ जानेवारी त्याच घटनास्थळालगत लागून असलेल्या जंगलात झुडपांमध्ये दुसरा बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. जवळच निलगायीचे अवषेश आढळले. या प्रकरणात हेतराम मधू गावळ (३८) रा.इंदिरानगर तिल्ली, देवराम श्यामलाल नागपुरे (३०) रा. चोपा (बाजारटोला), लिंगम रमेश येरोला (५५) रा.चोपा बाजारटोला, हेतराम गणपत मेश्राम (४१) रा.चोपा बाजारटोला या चौघांना अटक करण्यात आली. लिंगम याने गावातीलच मन्साराम यांच्या घरी लपवून ठेवलेले ४ नखे जप्त करण्यात आले. एका बिबट्याचे मुंडके कापून आरोपींनी गौरीटोला ते चांगोटोलादरम्यान असलेल्या पांगोली नदीच्या पाण्यात त्या बिबट्याचे मुंडके गाडून ठेवल्याची माहिती आरोपी हेतराम मधू गावळ (३८) याने वनाधिकाऱ्यांना दिली. दात, मिशी यांच्यासह मुंडके हे वनविभागाने जप्त केले. न्यायालयाने वाढवून दिलेल्या वन कोठडीत आणखी तपासात मदत होणार, अशी माहिती सहाय्यक उपवनसंरक्षक राजेंद्र सदगीर यांनी दिली आहे.