शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

६० घटनांत कोट्यवधीची मालमत्ता भस्मसात

By admin | Updated: June 15, 2016 02:18 IST

वर्ष २०१६ काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही ठरले आहे. या वर्षातील गेल्या साडेपाच महिन्यांच्या काळात आगीच्या ६० घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे.

साडेपाच महिन्यातील आगी : ३३ घटना शहराबाहेरीलकपिल केकत गोंदियावर्ष २०१६ काहींना भाग्याचे तर काहींसाठी दु:खाचेही ठरले आहे. या वर्षातील गेल्या साडेपाच महिन्यांच्या काळात आगीच्या ६० घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. या यात कित्येकांची रोजीरोटी हिरावल्या गेली तर अनेकांच्या डोक्यावरचे छत हिरावल्या गेले आहे. यातील काही घटनांतील नुकसानीची आकडेवारीही उपलब्ध होऊ शकली नाही. तरीही सुमारे दोन कोटींच्या वर मालमत्ता जळून खाक झाल्याची नोंद अग्निशमन विभागाने घेतली आहे. आग, पाणी आणि हवा या तत्वांपेक्षा शक्तिशाली कुणीही नाही. त्यामुळेच या तत्वांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. आग जाळून खाक करते. पाणी बुडवून टाकते, तर हवा आपल्या पाशात घेऊन उडवून टाकते. या तत्वांपासून कितीही सावधानता बाळगली तरीही या तत्वांच्या तडाख्यापासून कुणीही बचावू शकलेला नाही. याची प्रचिती विविध घटनांच्या माध्यमातून येत राहते. यात सन २०१६ च्या सुरूवातीच्या साडेपाच महिन्यांत आगीच्या ६० घटना घडल्या आहेत. या घटनांवर आळा बसविण्यासाठी गोंदियात अग्निशमन कार्यालय असून येथूनच जिल्ह्यात सेवा दिली जाते. या ६० घटनांतील ३३ घटना शहराबाहेरील असल्याची नोंद आहे. त्यात घर, दुकान, टपऱ्यांसोबत उद्योगांनाही आगी लागल्याची नोंद आहे. मात्र त्यात घरे जळण्याच्या घटना जास्त असल्याने अग्नितांडवात कित्येकांच्या डोक्यावरचे छत हिरावल्या गेले, तर कित्येकांची रोजीरोटी भस्मसात झाली आहे. साडेपाच महिन्यांत घडलेल्या या घटनांमध्ये गोरेगाव तालुक्यातील ग्राम हिरडामाली येथील राईस मीलमध्ये आग लागल्याची सर्वात मोठी घटना घडली आहे. ६ मार्च रोजी घडलेल्या या घटनेत सुमारे एक कोटींचे नुकसान झाल्याची नोंद आहे.