विषयतज्ज्ञांची मेहनत : चिमुकलीच्या हाताने कापली फितगोरेगाव : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टीने डीजीटल साधनांचा वापर करुन विद्यार्थी विकासात यश मिळत असल्याचे निदर्शनात येत आहे. यासाठी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देखील डिजीटल करण्यात आली व पहिलीत दाखल चिमुकली दृष्टी हरिकृष्ण कपाट हिच्या हस्ते डीजिटल वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पी.जी. कटरे, नगर पंचायत उपाध्यक्ष आशिष बारेवार, पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, गटसमन्यवक टी.बी. भेंडारकर, विस्तार अधिकारी आर.एल. मांढरे, केंद्रप्रमुख वाय.एस. भगत, व्यवस्थापन समिती अध्यक्ष दूर्वराज वैद्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.गोरेगाव सारख्या तालुकाच्या मध्यवर्ती ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गर्दी झालेली असल्याने जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याच्या पालकांचा दृष्टीकोण बदलणे गरजेचे झाले होते. याकरिता विषयतज्ञ सतिश बावनकर, सुनील ठाकूर, गोविंद ठाकरे, ओमप्रकाश ठाकरे, भाष्कर बहेकार, शालीनी रहांगडाले यांनी गावात शिक्षकांसोबत फिरुन पालकांना विश्वास देऊन पालक, गावकरी यांच्याकडून भरीव मदत गोळा केली. नगर पंचायतने देखील डीजीटल शाळा करण्यास मोलाचे सहकार्य केले.शैक्षणिक प्रवाहाला एक नवी दिशा देवून समर्पनाची भावना केवळ शिक्षकातच असून उपयोगी नाही तर विषयतज्ञांनी शिक्षकांना मदत करुन आपली कार्यसिद्धी करुन दाखविली. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रात गट साधन केंद्रातील विषयतज्ञांनी सुटीच्या दिवशी देखील निरंतर कार्य करुन निधी गोळा करणे, साहित्य खरेदी व जोडणी, वर्ग व परिसर सजावट करुन सदर कार्य यशस्वीरित्या पार पाडले. शाळा डिजिटल करण्यासाठी विषयतज्ञांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतूक करीत त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे उद्गार शिक्षण सभापती कटरे यांनी काढले. शाळा डीजीटल करण्यासाठी प्रशांत डवरे, प्राचार्य डायेट, राजेश रुद्रकार, हिदायत शेख व मुख्याध्यापिका ए.ई. चाकाटे व शिक्षकांचे सहकार्य लाभले. (शहर प्रतिनिधी)
गोरेगावच्या डिजिटल शाळेचे उद्घाटन
By admin | Updated: May 8, 2016 01:47 IST