शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पहिल्या पूर्णत: डिजिटल शाळेचे उद्घाटन

By admin | Updated: February 27, 2016 02:05 IST

लोकवर्गणीच्या माध्यमातून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षण देण्याच्या प्रेरणेतून जि.प. पूर्व माध्यमिक शाळा हिरडामालीला पूर्णत: डिजिटल करण्यात आले.

गोरेगाव : लोकवर्गणीच्या माध्यमातून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानयुक्त शिक्षण देण्याच्या प्रेरणेतून जि.प. पूर्व माध्यमिक शाळा हिरडामालीला पूर्णत: डिजिटल करण्यात आले. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. अतिथी म्हणून जि.प. चे मुख्य कायकारी अधिकारी दिलीप गावडे, शिक्षण सभापती पी.जी. कटरे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, खुशाल बोपचे, हेमंत पटले, पं.स. सभापती दिलीप चौधरी, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, डायट अधिव्याख्याता राजेश रूद्रकार, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, सरपंच कुंता बघेले उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांनी शाळेच्या चित्रफितीचे अवलोकन केले. डिजिटल शाळा संकल्पनेतून विद्यार्थ्यांना टॅबची सोय, प्रोजेक्टर, एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम सुरू आहे. पहिली ते सातवीचे वर्ग डिजिटल करणारी ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानयुक्त शिक्षण शाळा गावकऱ्यांच्या माध्यमातून साकार झाल्याचे बघून आनंद व्यक्त केला. दृकश्राव्य माध्यमातून मिळणारे शिक्षण चिरकाल टिकणारे असते. तसेच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत हिरडामाली शाळेने राज्यभर ओळख निर्माण करून जिल्ह्याचा गौरव वाढविला, असे उद्गार व्यक्त केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. तसेच विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)