शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

रेतीची अवैध वाहतूक जोमात सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:28 IST

सुकडी - डाकराम : तिरोडा तालुक्यात अवैध रेतीची चोरटी वाहतूक जोरात सुरू आहे. रेतीमाफियांच्या या दबंगगिरीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत ...

सुकडी - डाकराम : तिरोडा तालुक्यात अवैध रेतीची चोरटी वाहतूक जोरात सुरू आहे. रेतीमाफियांच्या या दबंगगिरीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांचे मनसुबे वाढले असून, ते कुणालाही जुमानत नसल्याचे दिसत आहे. मात्र, रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या या वाहनांमुळे अपघातांची शक्यता बळावली आहे.

तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा, घाटकुरोडा, पिपरिया, चांदोरी, अर्जुनी व सावरा या रेतीघाटांवरून अनेक दिवसांपासून रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. रेतीमाफियांच्या या प्रकाराकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे रेतीची खुलेआम वाहतूक केली जात आहे. यामुळे यात काहीतरी मिलीभगत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. रेतीची ही अवैध वाहतूक येथून होत असून, रेती वाहतूक करणारे ट्रकचालक कुणाची पर्वा न करता भरधाव वेगात गावातून ट्रक नेतात. त्यामुळे अपघातांचीही शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर बोदलकसा तलावात पाणी जाण्यासाठी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ चे काम जोरात सुरू आहे. त्यातच अवैध रेती वाहतुकीचे ट्रक अत्यंत वेगाने धावत असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या व्यक्तिंचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या प्रकाराकडे लक्ष देऊन प्रशासनाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकचालक व मालकांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

..............

शासनाचा महसूल पाण्यात

तिरोडा तालुक्यातील रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक सुरू असून, याकडे महसूल यंत्रणेचे पूर्णपणे दुुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. रेतीच्या अवैध वाहतुकीची माहिती संबंधित विभागाला देऊनसुध्दा याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.