शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सागवानाची अवैध कटाई

By admin | Updated: January 19, 2017 01:26 IST

कोसमतोंडी परिसरातील मौजा मुरपार लेडेझरी येथील मार्तंड श्यामराव काशीवार यांच्या गटातील आदिवासी व गैरआदिवासींच्या शेतामधील

पांढरी : कोसमतोंडी परिसरातील मौजा मुरपार लेडेझरी येथील मार्तंड श्यामराव काशीवार यांच्या गटातील आदिवासी व गैरआदिवासींच्या शेतामधील सागवान अंदाजे २ लाख ४० हजार रुपयांचा माल कोसमतोंडी येथील क्षेत्रसाधक अधिकारी आणि वनरक्षक व वनमजुराच्या संगमताने कंत्राटदारासोबत कापण्यात आले. हा माल संग्रहीत केल्याची तक्रार गावकऱ्यांनी १० जानेवारीला उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य संरक्षण कार्यालय नागपूर यांना देऊ केली असता जे.जे.खोबरागडे, उद्धव गायकवाड व भुते यांनी कापलेल्या मालाची तक्रार होताच, त्या मालाचा पंचनामा करून सर्व माल लॉगीन लिस्टप्रमाणे बरोबर आहे असा अहवाल तयार करून रेंज आॅफीस सडक-अर्जुनी येथील जनार्धन राठोड यांना दिला. त्या कापलेल्या झाडाची तक्रार जर गावकऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नसती तर वनरक्षक व कंत्राटदार यांनी साठ-गाठ करून सर्वमाल हजम केला असता. या सर्व मालाची चौकशी गोंदिया कार्यालयातील सहायक वनसंरक्षक यु.टी.बिसेन यांनी करून पासिंग हातोडा लावला. अधिकृत माल जप्त करून चार ट्रॅक्टर सागवान माल डोंगरगाव डेपोला जप्त करण्यात आला. या परिसरामध्ये कंत्राटदारासोबत साठ-गाठ करून येथील अधिकारी वर्गाचा कित्येक दिवसांपासून गोरखधंदा सुरू असल्याचे बोलले जात आहे. गावकऱ्यांना हा प्रकार निदर्शनास आल्यावर अधिकारी उघड्यावर आले आहेत. शासन झाडे लावा, झाडे जगवा म्हणून दररोज संदेश देत असून वनरक्षकसुध्दा वनांचे रक्षण न करता वन तोडणाऱ्यांना साथ देत आहेत. या आदिवासी गटामध्ये सागवनाचे झाड लावले असताना झाडे तोडण्याचे प्रकरण तयार केले की नाही? अधिकाऱ्यांनी योग्य चौकशी केली काय? शेतकऱ्यांनी आपल्या गटातील माल कापल्यावर त्या गटाची चौकशी केली जाते या गटाची चौकशी झाली काय व जाणाऱ्या-येणाऱ्या रस्त्यावरील सागवनाचे झाड तोडता येते काय? याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. कोसमतोंडी परिसरातील वनक्षेत्र अधिकारी जे.जे.खोब्रागडे, वनमजुर उध्दव गायकवाड, येथील वनरक्षक भुते यांच्या कार्यप्रणालीची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.(वार्ताहर)