शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त जेठभावडा स्वच्छतेतही ठरतेय जिल्ह्यात आदर्श

By admin | Updated: January 22, 2017 00:46 IST

स्वच्छतेची गोष्ट असो की, जलयुक्त शिवार अभियानाची असो, किंवा केंद्र सरकारच्या डिजिटल अभियानाची असो,

७० टक्के आदिवासी गाव : गावात प्रत्येक घरासमोर कचराकुंडी नरेश रहिले   गोंदिया स्वच्छतेची गोष्ट असो की, जलयुक्त शिवार अभियानाची असो, किंवा केंद्र सरकारच्या डिजिटल अभियानाची असो, या सर्वात देवरी तालुक्यातील जेठभावडा हे गाव आदर्श ग्राम पंचायत म्हणून नावारूपास येत आहे. आयएसओ मानांकित जेठभावडा ग्राम पंचायत १०० टक्के हागणदारीमुक्त झाली आहे. या गावात कचऱ्याचे ढिगारे सोडा कचऱ्याचा एक तुकडाही दिसत नाही. देवरी तालुक्याच्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त व आदिवासी भागात १५०० लोकसंख्या असलेले जेठभावडा हे गाव आहे. या गावातील ७० टक्के जनता आदिवासी आहे. येथील सरपंच डॉ. जितेंद्र रहांगडाले यांच्या प्रयत्नाने ग्राम पंचायत डिजिटल झाली आहे. या ग्राम पंचायत अंतर्गत असलेल्या प्रत्येक घरात शौचालय तयार करण्यात असाले. त्यामुळे उघड्यावर शौच करणाऱ्यांना पकडण्यासाठी आलेल्या गुडमार्निंग पथकाला खाली हाताने परतावे लागले. सकाळी ६ वाजता ‘गुड मॉर्निंग’ पथक जेठभावडा येथे पोहचले. या ग्राम पंचायत अंतर्गत जेठभावडा, सिंदीबिरी व मसूरभावडा मध्ये स्वत: जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश देशमुख, देवरीचे गटविकास अधिकारी पांडे, सरपंच डॉ. जितेंद्र रहांगडाले, ग्रामसेवक व इतर अधिकारी-कर्मचारी सतत तीन तास गावात वॉच करीत होते. परंतु एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जातांना दिसले नाही. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राजकुमार पुराम देवरी तालुक्याचे पालक अधिकारी आहेत. त्यांनी देवरी तालुक्याला हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.