शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला जाऊन हिरो व्हायचेय म्हणून सोडले घर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:33 IST

गोंदिया : सिनेसृष्टीतील कलावंतांसारखे आपलेही नावलौकिक व्हावे, अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्या मुला-मुलींना मुंबईचे वेड लागते. लहानपणापासून सिनेमातील नाचगाणे ऐकत ...

गोंदिया : सिनेसृष्टीतील कलावंतांसारखे आपलेही नावलौकिक व्हावे, अशी मनोमन इच्छा बाळगणाऱ्या मुला-मुलींना मुंबईचे वेड लागते. लहानपणापासून सिनेमातील नाचगाणे ऐकत व त्याचे प्रात्याक्षिक करत मुंबईची रस्ता धरणाऱ्या अनेक मुला-मुलींना रेल्वेस्थानकावर पकडण्यात आले. जिल्हा पोलिसांनीही अनेकदा ऑपरेशन मुस्कानच्या मोहिमेत घरातून बाहेर पडलेल्या मुला-मुलींना रेल्वेस्थानक व बसस्थानकावरून पकडून पालकांच्या स्वाधीन केले. गोंदिया जिल्ह्यातील अनेक मुलामुलींनी मुंबईला हिरो बनण्यासाठी आपले घर सोडून मुंबईदेखील गाठली आहे. काही मुले-मुली बेपत्ता होता तर काही मुले-मुली स्वत:हून घर सोडून देतात. गोंदिया जिल्ह्यातून हरविलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुला-मुलींना ऑपरेशन मुस्कानच्या माध्यमातून पकडून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

.......................

कोणाला बंगला, गाडीचे आकर्षण, तर कोणाला घरातील वादाचा कंटाळा

- बहुतांश मुला-मुलींना आपला बंगला असावा, गाडी असावी असे आकर्षण असल्याने ते याचा ध्यास ठेवून घराबाहेर पडतात.

- घराबाहेर पडल्याशिवाय आपला विकास होणार नाही, जग कसे आहे हे घराबाहेर पडल्यानंतरच कळेल असे समजून मुले-मुली बाोर पडतात.

- घरात आईवडिलांचा सतत होणारा वाद, त्यांची कटकट यामुळे घर सोडून अनेक मुले घरातून बाहेर पडतात.

...............

म्हणून घर सोडले....

आपल्याला अभिनेत्री व्हायचे आहे. आईवडिलांच्या संमतीने आपण घराबाहेर पडले. मुंबईत नाटक, चित्रपटात काम करून आपलेही नाव समाजात मोठे करील या आशेने मुंबईला गेली. काही वर्षे काम केले, परंतु तिथे कुणाची मदत होत नसल्याने मी परत आली, असे एका मुलीने म्हटले आहे.

.............

मला सिनेमात काम करायचे आहे म्हणून गोंदिया सोडून मुंबई गाठली.

अनेक सिनेमात व सीरियलमध्ये काम करून आपले नाव मोठे करण्याचे स्वप्न रंगवित आहे. कामाला जोमाने सुरुवातही झाली. परंतु कोरोनाच्या संकटामुळे आमच्या प्रगतीला ब्रेक लागला आहे. आता गाडी पुन्हा हळूहळू सुरू झाली आहे, असे एका गोंदियातील तरुणाने सांगितले.

.............

मिळालेली बालके चाईल्ड लाइनच्या स्वाधीन

रेल्वेस्थानकावर दरराेज बंदोबस्त लावला जातो. या बंदोबस्तादरम्यान रेल्वेस्थानकावर एकटा मुलगा किंवा मुलगी असेल तर आमच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून विचारपूस केली जाते. आम्हाला वाटले की मुलगा-मुलगी घर सोडून आलेत तर त्यांना चाईल्ड लाइनसोबत संपर्क साधून त्यांच्या स्वाधीन करण्यात येते.

- नंद बहादूर, रेल्वे सुरक्षा बल अधिकारी गोंदिया.

.....