शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पती पाठोपाठ पत्नीचीही प्राणज्योत मालवली ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:31 IST

बोंडगावदेवी : घरामध्ये आनंदीमय वातावरणात अल्पश: आजाराने पती-पत्नीला घेरले. दोघांवर औषध उपचार सुरु होता. पतीला शहराच्या ठिकाणी औषधोपचार सुरु ...

बोंडगावदेवी : घरामध्ये आनंदीमय वातावरणात अल्पश: आजाराने पती-पत्नीला घेरले. दोघांवर औषध उपचार सुरु होता. पतीला शहराच्या ठिकाणी औषधोपचार सुरु असताना नियतीने घाला घातला. अखेर पतीने मृत्यूला कवटाळले. पत्नी अंथरुणावर पडली. पती निघून गेल्याची बाब सुद्धा पत्नीला माहीत होऊ देण्यात आली नाही. प्रकृती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच नागपूरला हलविण्यात आले. परंतु नियतीला ते मान्य नसावे. शर्थीचे प्रयत्न करुन मंगळवारी (दि.४) रात्री ११.३० वाजता पत्नीची प्राणज्योत मालवली. पाच दिवसाच्या अंतराने पतीच्या पाठोपाठ पत्नीचेही निधन झाल्याने लोणारे परिवारावर दु खाचा डोंगर कोसळला.

येथील रहिवासी असलेले सिद्धार्थ मुखलता लोणारे हे नोकरी निमित्ताने वडसा येथे राहत होते. दोन वर्षांपूर्वीच ते प्राचार्य पदावरुन सेवानिवृत्त झाले होते. पत्नी सरोज, मुलगा निलेश, मुलगी स्नेहल यांच्यासोबत आनंदाने राहत होते. मुलगा व मुलगी शिक्षणासाठी आई-वडिलांपासून दूर राहत होते. बोंडगावदेवी या आपल्या जन्मगावी पत्नीसह येण्याचा त्यांचा नित्यनेम होता. मित्र परिवार, नातलग यांच्या कार्यक्रमात त्यांची आवर्जून उपस्थिती राहायची. कोरोना महामारीच्या संक्रमणात क्रूर काळाने घाला घातला. पती-पत्नी दोघांचीही प्रकृती बिघडली. सिद्धार्थ लोणारे यांच्यावर गडचिरोली येथे औषधोपचार सुरु असताना ३० एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले. सज्ञान असलेल्या निलेश या मुलाने वडिलांच्या निधनाची माहिती आईला होऊ दिली नाही. पती दुरुस्त होऊन घरी येतील अशी आशा पत्नी सरोज करीत होती. पत्नी आजाराने ग्रस्त होती. आईची प्रकृती बरी व्हावी म्हणून मुलाने डॉक्टरच्या सल्ल्याने आईच्या उपचारावर भर दिला. परंतु नियतीला हे मान्य नसावे. प्रकृतीत सुधारणा न होता खालावत गेली. नागपूरला हलविण्यात आले. अखेर ४ मे रोजी रात्री ११.३० वाजता सरोज सिद्धार्थ लोणारे यांनी अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ (६०) सरोज (५०) या पती-पत्नीच्या एकाएकी निधनाने लोणारे परिवारावर दु:खाचे सावटच कोसळले. सज्ञान असलेल्या दोन्ही बहीण- भावाचे आधारवड हरपले.