शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी मदतीची आशा धुसर

By admin | Updated: October 1, 2015 02:00 IST

अनियमित आणि कमी पावसामुळे जिल्ह्यात यावर्षी पिकांची स्थिती गेल्यावर्षीच्या तुलनेत बिकट आहे.

पुन्हा दिला पैसेवारीचा अहवाल : एकाही गावात पैसेवारी ५० च्या आत नाहीगोंदिया : अनियमित आणि कमी पावसामुळे जिल्ह्यात यावर्षी पिकांची स्थिती गेल्यावर्षीच्या तुलनेत बिकट आहे. त्यातच राज्य शासनाने दुष्काळसदृश परिस्थितीसंदर्भात जाहीर केलेले ६७ पैसे पैसेवारीचा निकष बदलवून नव्याने नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यास सांगितले. बुधवारी जिल्हा प्रशासनाने ही पैसेवारी जाहीर केली. त्यात जिल्ह्यातील एकही गाव ५० पैशाच्या आत नाही. त्यामुळे पिकांची स्थिती फारसी चांगली नसली तरी शासनाच्या निकषात बसत नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी शासकीय मदत मिळण्याची आशा धुसर झाली आहे.यावर्षीच्या पावसाच्या नोंदी घेण्याचा बुधवारी (दि.३०) शेवटचा दिवस होता. पावसाळा आता खऱ्या अर्थाने संपला आहे. त्यामुळे आता पाऊस येण्याची शक्यता जवळजवळ नाहीच, आणि आला तरी तो धानाच्या पिकाला किती फायदेशिर ठरेल हे सांगता येत नाही. यावर्षी झालेला पाऊस पुरक प्रमाणात नसल्यामुळे धानाचे अपेक्षित उत्पन्न होणार नाही. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने पाठविलेल्या अहवालानुसार नजरअंदाज पैसेवारी ८१ पैसे दाखविली आहे. गेल्यावर्षी हीच नजरअंदाज पैसेवारी १०८ होती. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी स्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ९७ हजार हेक्टरवर पिकांची लागवड होते. त्यात मुख्य पिक असलेल्या धानावरच शेतकऱ्यांचे वार्षिक बजेट अवलंबून असते. बारमाही ओलिताची सोय नसल्यामुळे मोजक्याच शेतजमिनीवर रबी हंगामात धानाची लागवड होते. अशा परिस्थिती शेतकऱ्यांची संपूर्ण मदार खरीप हंगामावरच असताना निर्माण झालेली ही परिस्थिती शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी आहे.१ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत १३४० मिमी पाऊस पडतो. मात्र यावर्षी हा कालावधी संपला असताना जेमतेम १००० मिमीच्या आसपास पाऊस पडला आहे. पाण्याअभावी पिकांची वाढ पाहीजे तशी झाली नाही. परिणामी धान किती भरणार आणि पिक कसे येणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षीसुद्धा पाऊस कमी होता. मात्र शेवटी-शेवटी पावसाने बरीच कसर भरून काढली होती. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी उत्पन्नात घट येणार हे निश्चित झाले आहे.शासनाने जाहीर केलेली ही नजरअंदाज पैसेवारी असली तरी जानेवारीमध्ये अंतिम पैसेवारी किती राहील त्यावर नुकसानभरपाईचे गणित अवलंबून राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)