शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सुरू झाली होर्डिंग्स हटाओ मोहीम

By admin | Updated: May 24, 2014 23:40 IST

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच शहरात नवनिर्वाचित खासदारांना शुभेच्छा देणार्‍या होर्डींग्सने शहर पुन्हा एकदा होर्डींग्समय झाले होते. बघावे तेथे होर्डींग्स दिसून येत होते. यावर मात्र पुन्हा

होर्डिंग्स काढण्याचे दिले निर्देश : पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता लागू

गोंदिया : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागताच शहरात नवनिर्वाचित खासदारांना शुभेच्छा देणार्‍या होर्डींग्सने शहर पुन्हा एकदा होर्डींग्समय झाले होते. बघावे तेथे होर्डींग्स दिसून येत होते. यावर मात्र पुन्हा लगाम लागली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाने होर्डींग्स काढण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शनिवारी (दि.२४) शहरात होर्डींग्स हटाओ मोहीम सुरू झाल्याचे दिसून आले.

लोकसभा निवडणुकीचे निकाल १६ मे रोजी जाहीर झाले. भारतीय जनता पक्षाचे नाना पटोले निवडणुकीत विजयी झाल्याने शहरात त्यांच्या चाहत्यांनी तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अवघ्या जिल्हाभरात होर्डींग्स लाऊन आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. शहरात तर काही जास्तच प्रमाणात नानांचा चाहता वर्ग दिसून आला. बघावे तेथे होर्डींग्स दिसून येऊ लागले. यातून रस्त्यांचे दुभाजक सुद्धा सुटले नाही. काहींनी नगर परिषदेकडे कर भरून होर्डींग्स लावले तर बहुतांश चाहत्यांनी नियम तोडून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. होर्डींंग्सच्या या युद्धात शहराचे सौंदर्यीकरण मात्र पुन्हा बकाल झाले होते.

असे असतानाच मात्र पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आचारसंहिता लागू झाली. यावर जिल्हा निवडणूक विभागाने शुक्रवारी (दि.२३) राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना निवडणूक कार्यक्रम आचारसंहितेला घेऊन आवश्यक ती माहिती दिली. एवढेच नव्हे तर उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व नगर परिषद मुख्याधिकारी यांना शहरातील होर्डींग्स काढण्यासाठी आवश्यक ते निर्देश दिलेत. यावर नगर परिषद कामाला लागली असून शहरात होर्डींंग्स लावणार्‍या कित्येकांनी आपापले होर्डींंग्स काढण्यास सुरूवात केल्याचे शनिवारी (दि.२४) दिसून आले. त्यामुळे होर्डींंग्स लाऊन नानांना आपले प्रेम व्यक्त करणार्‍यांना होर्डींंग्स काढावे लागत आहे. एकंदर आचारसंहितेमुळे शहरात पुन्हा एकदा होर्डींंग्स हटाओ मोहिम सुरू झाल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)