शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमातून बाबासाहेबांचा इतिहास वगळला

By admin | Updated: October 1, 2015 02:09 IST

केंद्रीय अभ्यासक्रम आयसीएसईच्या दहाव्या वर्गाच्या इतिहास ‘टोटल हिस्ट्री अ‍ॅन्ड सिव्हिक्स’ नामक पुस्तकातून भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ....

आंबेडकरी जनतेने केला निषेध : राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनगोंदिया : केंद्रीय अभ्यासक्रम आयसीएसईच्या दहाव्या वर्गाच्या इतिहास ‘टोटल हिस्ट्री अ‍ॅन्ड सिव्हिक्स’ नामक पुस्तकातून भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासाचा उल्लेखच करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री व मानव संसाधन विकास मंत्री यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून विरोध व्यक्त केला.इतिहासाच्या सदर पुस्तकाचे प्रकाशन मॉर्निंग स्टार पब्लिकेशन नवी दिल्लीद्वारे करण्यात आले. वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील डॉली एलन नामक महिलेने या पुस्तकाचे लेखन केले आहे. तर बंगलुरू येथील रहिवासी एस. इरूदया राजने पुस्तकाचे संपादन केले आहे. या वेळी आंबेडकरवादी प्रतिनिधी मंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशातीलच नव्हे तर संपूर्ण विश्वातील नवीन पिढी व विद्यार्थ्यांचे प्रेरणास्त्रोत आहेत. विश्वातील अनेक देशांनी त्यांच्या बुद्धिमत्तेवर आस्था ठेवून त्यांचे पुतळे स्थापित करून आपला आदर व्यक्त करीत आहेत. परंतु देशातील मनुवादी मानसिकता बाबासाहेबांचा इतिहास दडपण्याचा निंदनीय प्रयत्न करीत आहे. त्यामुळे येणारी पिढी बाबासाहेबांचे अमूल्य कार्य व ज्ञानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या इतिहासाच्या पुस्तकात महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष व क्रिकेटर सचिन तेंदूलकरलाही स्थान देण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासाचा त्वरित सदर इतिहासाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा व पूर्वप्रकाशित पुस्तिकेला अभ्यासक्रमातून हटविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंबेडकरवादी संघटनांनी दिला आहे.याप्रसंगी प्रतिनिधी मंडळात यशपाल डोंगरे, विलास राऊत, अशोक बेलेकर, उमेश नागदेवे, मुकेश ठवरे, मनिष मेश्राम, विक्की बघेले, राजेश चौरे, दिपेंद्र वासनिक, नागेश चव्हाण, राजन चौबे, शुद्धोदन शहारे, निलेश देशभ्रतार, अनिल सुखदेवे, वसंत गणवीर, आसिफ अंसारी, राजेश मेश्राम व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)