शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सालेकसाच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती

By admin | Updated: October 2, 2015 06:22 IST

येत्या १ नोव्हेंबरला इतर नगर पंचायतींसोबत सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक घेण्याबाबत अधिसूचना काढण्यात

सालेकसा : येत्या १ नोव्हेंबरला इतर नगर पंचायतींसोबत सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक घेण्याबाबत अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगनादेशामुळे आता सालेकसा नगर पंचायतीची निवडणूक लांबणीवर गेली आहे. या आदेशामुळे नगर पंचायतीत आम्हाला समाविष्ठ करा, अशी मागणी करणाऱ्या आमगाव खुर्दवासीयांना दिलासा मिळाला असून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुसरीकडे निवडणुकीच्या कामात लागलेल्या सालेकसा नगर पंचायतच्या इच्छुक उमेदवारांमध्ये अचानक नैराश्य पसरले आहे. निवडणूक यंत्रणेची कामेही या आदेशाने ठप्प झाली आहेत. १ नोव्हेंबर २०१५ रोजी नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार होते. त्यासाठी ३० सप्टेंबर रोजी सर्व पाच तालुक्यात अधिसूचना काढण्यात आली. उमेदवारांचे नामनिर्देशीत अर्ज सादर करण्याचे असल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतु स्थगनादेश आल्याने त्यांचा हिरमोड झालेला दिसत आहे.(तालुका प्रतिनिधी)स्थगिती का आली?सालेकसा तालुक्याचे कामकाज सालेकसाच्या नावाने असले तरी येथील सर्व सरकारी कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठान मुख्य बाजारपेठा व बहुतांश परिसर आमगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत. या ग्रामपंचायतला लागुन सालेकसा ग्रामपंचायत परिसर आहे. परंतु प्रत्यक्षात सालेकसा नावाचे गाव या परिसरात नाही. सालेकसा ग्राम पंचायतमध्ये येणारे गाव हे शहराबाहेर खूप दूरवर जंगलापर्यंत पसरलेले व विखुरलेले आहेत. त्यामुळे नगर पंचायतीची वास्तविक हक्कदार आमगाव खुर्द ग्रामपंचायत होती. परंतु शासनाने नगर पंचायत निर्माण करताना परिसराचा विचार न करता ज्या नावाने तालुका मुख्यालय चालत आहे त्या ग्रामपंचायतीलाच नगर पंचायत बनविण्याचा निर्णय घेतला. यामुळे आमगाव खुर्दमध्ये राहणारे लोक व ग्रामपंचायत पदाधिकारी सुद्धा कमालीचे संतप्त झाले. त्यांनी अनेक वेळा शासनाशी पत्रव्यवहार करुन आमगाव खुर्दला नगर पंचायतीत समावेश करण्याची विनंती केली. परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केले. नाईलाजाने गावकरी ग्रामपंचायतीचा मदतीने कोर्टाचे दार ठोठावण्यासाठी गेले. तेथे त्यांना या निवडणुकीसाठी स्थगिती आणण्यात यश आले.