शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

शहरात हत्तीरोगाचा संशयित रूग्ण

By admin | Updated: August 16, 2014 23:33 IST

जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप वाढतच जात असताना आता शहरात हत्तीरोगाचा एक संशयित रूग्ण आढळला आहे. यामुळे शहरात अधिकच खळबळ माजली असून यावरून नगर पालिका

वसंतनगरातील इसम : न.प.व हिवताप विभागाचा गलथान कारभारगोंदिया : जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचा प्रकोप वाढतच जात असताना आता शहरात हत्तीरोगाचा एक संशयित रूग्ण आढळला आहे. यामुळे शहरात अधिकच खळबळ माजली असून यावरून नगर पालिका व हिवताप अधिकारी कार्यालयाचा गलथान कारभार पुढे येत आहे. शहरात डासांचे प्रमाण वाढल्यामुळे पालिकेकडून किती फवारणी करण्यात आली हे उघडकीस येते. जिल्ह्यात ग्रामीण भागात डेंग्यू व मलेरियाने चांगलाच उच्छाद मांडला आहे. गावागावांत डेंग्यू व मलेरिया पसरला असून काहींचा तर जीव सुद्धा गेला आहे. डासजन्य आजारांचा वाढता प्रकोप बघता फवारणी करणे गरजेचे असते. मात्र गावचे गावच आता डेंग्यू व मलेरियाच्या विळख्यात येत असल्याने ग्रामीण भागात हिवताप कार्यालयाकडून सुरक्षेच्या किती उपाययोजना करण्यात आल्या हे दिसून येते. हा सर्व प्रकार सुरू असतानाच आता शहरात हत्तीरोगाचा एक रूग्ण आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. शहरातील वसंतनगरातील निवासी मधुकर बेहलपांडे यांना मंगळवारी (दि.१३) रात्री अचानक ताप आला. तसेच त्यांच्या जांघेत गाठ आली व डावा पाय लाल होऊन सूजला आहे. हत्तीरोगाचे सुद्धा हेच लक्षण असल्याचे हिवताप विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावरून बेहलपांडे यांना हत्तीरोगाची लागण झाल्याचा संशय बळावला आहे. पावसाळ्यात डासजन्य आजार फोफावतात व त्यादृष्टीने फावरणीची गरज असते. फवारणीच्या माध्यमातूनच डासांची उत्पत्ती व त्यांचा नायनाट शक्य आहे. मात्र बेहलपांडे हे सध्या तरी हत्तीरोग संशयीत असल्याने पालिकेच्या सफाई विभागाने किती तत्परतेने शहरात फवारणी केली हे उघड होते. तर महत्वाची बाब म्हणजे शहरवासीयांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांच्या कार्यप्रणालीवरही यातून प्रश्न चिन्ह उभा होतो. त्यातही महत्वाची बाब म्हणजे वसंतनगर हा भाग विद्यमान नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या प्रभागात येतो. यावर हिवताप अधिकारी डॉ. सलील पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी लक्षणे हत्तीरोगाचीच असल्याने रात्री कर्मचारी त्यांच्या घरी पाठवून रक्ताचे नमूने घेतो. अहवालात स्पष्ट झाल्यावर त्वरीत त्यांच्यावर उपचार सुरू करणार असल्याचे सांगीतले. (शहर प्रतिनिधी)