शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

येथे दिले जातात आदर्श समाजनिर्मितीचे धडे

By admin | Updated: May 28, 2015 01:15 IST

बाल संस्कार शिबिराची सांगता$$्रिंअर्जुनी मोरगाव : हे धावपळीचे युग आहे. कुणालाही कुणाशी मनसोक्त संवाद करण्याची सवय नाही.

बोरी येथील उपक्रम : बाल संस्कार शिबिराची सांगता$$्रिंअर्जुनी मोरगाव : हे धावपळीचे युग आहे. कुणालाही कुणाशी मनसोक्त संवाद करण्याची सवय नाही. माणूस माणसापासून दूर होत आहे. या वैज्ञानिक युगात टी.व्ही. मोबाईल व व्यसनाने आजच्या युवा-पिढीवर आक्रमण केले आहे. या सर्व बाबी युवापिढीच्या ‘फॅशन्स’ झाल्या आहेत. आजच्या युवापिढीला यापासून परावृत्त करता येईल काय? या महत्त्वाकांक्षेने झपाटलेले बोरी येथील गावकरी गेल्या पाच वर्षांपासून बाल संस्कार शिबिराचे आयोजन करतात. रविवारला (दि.२४) बारा दिवसीय या शिबिराची सांगता झाली.अगदी ८०० लोकसंख्या असलेले बोरी (महागाव) हे गाव. मात्र या गावावर राष्ट्रसंताचा पगडा पडला आहे. राष्ट्रसंतांचे विचार या गावात रुजले आहेत. केवळ पुस्तकी ज्ञानार्जनाचे शिक्षण उरले आहे. राष्ट्रसंताची शिकवण, संस्कार, नीतिमूल्यांची जपणूक या सर्वांचा ऱ्हास होत आहे. पेराल तसं उगवेल अशी एक म्हण प्रचलित आहे. आज या युवापिढीमध्ये काही तरी चांगली संस्कारमूल्ये पेरण्याची गरज आहे. आज पेरले तर उद्या निश्चितपणे ही भावी पिढी यशस्वी वाटचाल करु शकेल. आई-वडील, देश, नीती, संस्कार, अस्मिता व मातृभूमीवर प्रेम करायला शिका. हीच आपली संस्कृती आहे. परंतु हल्ली अतिफॅशनबाजीमुळे अंगप्रदर्शन वाढले आहे. टीव्ही, मोबाईलचा संचार या बालमनावर अतिक्रमण करीत आहे. ही आपली संस्कृती नाही. पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणाकडे युवापिढी आकर्षित होत आहे. युवापिढीच्या या वाटचालीमुळे संस्कृतीच जखमी व्हायला लागली आहे. या सर्व घटकांवर मात करण्यासाठी बालसंस्कार शिबिराची गरज आहे. या उदान्त हेतूने झपाटलेल्या बोरी येथील दुर्योधन मैंद, हिरालाल घोरमोडे, भूमेंद्र चव्हाण यांनी गावकऱ्यांच्या पुढाकाराने बालसंस्काराची चळवळ गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यास सुरुवात केली. आजही ही ज्योत तेवत आहे. ही ज्योत मशाल म्हणून इतर गावातही तेवत ठेवावी, असे आवाहन त्यांनी या बाल संस्कार शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमातून केले आहे. या शिबिरात अर्जुनी-मोरगाव, साकोली, सडक-अर्जुनी, ब्रह्मपुरी व लाखांदूर तालुक्यातील १४ ते १८ वयोगटातील ५० शिबिरार्थी सहभागी झाले होते.राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज मोझरी व बोरीवासीयांतर्फे दरवर्षी मुले व मुलींकरिता हे मोफत शिबिर घेतले जाते. या शिबिरात हिंदू, बौद्ध व मुस्लीम अशा सर्व प्रवर्गातील मुले-मुली सहभागी होतात. या शिबिरात शारीरिक, बौद्धीक, संगीत, व्यक्तिमत्त्व विकास, लाठी-काठी, मलखांब, आचरण, संस्कार या सर्वंकष शिक्षणाचा अंतर्भाव असतो. पहाटे ४ वाजतापासून तर रात्री १० वाजतापर्यंत हे शिबिर अत्यंत शिस्तीत चालते. या शिबिरात गुरुकुंज मोझरी येथील गणेश बोथडे, अक्षय देशमुख, राम वनस्कर व रवी गायकवाड या चार प्रशिक्षकांनी प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिले. समारोपीय कार्यक्रमात प्रशांत ठाकरे या युवकाने आपल्या मधुरवाणीतून प्रशिक्षणार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. हे शिबिर आचार्य हरीभाऊ वेरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. या पाच वर्षांत ४०० युवकांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात राष्ट्रधर्म युवा मंचचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक नागपूर, सदाशिव पुरोहित, एन.आर.एच.एम.चे उपविभागीय अभियंता सुनील तरोणे, ख्रिस्तानंद हॉस्पिटल ब्रह्मपुरीचे डॉ. प्रशांत झोडे, कोरंभीटोलाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. झोडे, भूते, लाखांदूर पं.स.चे माजी उपसभापती रामचंद्र राऊत, माजी पं.स. सभापती वर्षा घोरमोडे आदी मान्यवर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी )